Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून - पुढारी

Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद-मिसरवडी येथील एका 25 वर्षीय प्लॉटिंगचा व्यावसाय करणाऱ्या तरुणाचा 9 जणांच्या टोळक्याने शनिवारी(दि.15) मध्यरात्री चाकू हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली. हसन साजिद पटेल(25 रा.मिसरवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad Crime)

मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मयत हसन शनिवारी (दि.15) रात्री 9 वाजता घरातून बाहेर पडला होता. तो औरंगाबादमधील मिसरवाडीतील एका पान टपरीवर उभा असताना या ठिकाणी आलेल्या 9 जनापैकी एकाने हसनवर चाकूने सपासप वार केले. यात तो जागीच गतप्राण झाला.

या 9 जणा मध्ये तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासीर अब्दुल पटेल, रहीम अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आणि आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी आदींचा समावेश होता असे तक्रारीत म्हंटले आहे.

दरम्यान हसनवर तालेब चाऊस ने चाकूने वार केल्याचे पोलिसांना सांगितले. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास दुय्यम पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर करीत आहेत. (Aurangabad Crime)

हेही वाचा

Back to top button