Manoj Jarange Patil: बावनकुळेंवर टीका करताना जरांगे पाटलांनी केली बाहुबलीतील ‘कालकेय’ची मिमिक्री; सभेतील VIDEO व्हायरल

Manoj Jarange Patil Viral Video: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तांदुळवाडी येथील सभेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली.
Manoj Jarange Patil Video
Manoj Jarange Patil VideoPudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Viral Video: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे झालेल्या सभेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत ‘बाहुबली’ चित्रपटातील कालकेय या पात्राची मिमिक्री करून दाखवली.

सभेत जरांगे पाटील यांनी आपल्या खास शैलीत मिमिक्री करत बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या मिमिक्रीमुळे उपस्थितांमध्येही जोरदार चर्चा रंगली.

जरांगे पाटील यांनी बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीची तुलना कालकेय पात्राशी करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या या मिमिक्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि सरकारमधील नेत्यांमध्ये यापूर्वीही अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. आता तांदुळवाडी येथील सभेत त्यांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या या टीकेमुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

जरांगे पाटील यांची ‘कालकेय’ची मिमिक्री नेमकी काय होती आणि त्यांनी बावनकुळेंवर कोणत्या मुद्द्यावरून निशाणा साधला, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news