Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026
Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026Pudhari

Maharashtra Zilla Parishad Elections Live: पुणे जिल्ह्यात दुपारी दीड पर्यंत किती मतदान?

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026: आज शनिवारी मतदान होणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 समित्यांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात दुपारी दीड पर्यंत किती मतदान?

पुणे जिल्ह्यात दुपारी दीड पर्यंत ३६.६७ टक्के मतदान झाले.

लातूर जिल्ह्यात दुपारी दीडपर्यंत किती मतदान?

लातूर जिल्ह्यात दुपारी ०१.३० वाजेपर्यंत ३५.९४ टक्के मतदान

महाडमध्ये दुपारी दीडपर्यंत किती टक्के मतदान?

महाड तालुक्यात दुपारी 1.30 वाजेपर्यंत 44.15 टक्के मतदान. आत्तापर्यंत 31, 118 पुरुष तर 30, 443 महिला अशा एकूण मिळून 61 हजार 561 मतदारांनी हक्क बजावला.

पाथरीत कार्यकर्ते भिडले, एक जण जखमी

परभणीच्या पाथरीतील देवनांद्रा जिल्हा परिषद गटातील गुलशन नगर येथील मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून काँग्रेस आणि एकनाथ शिंदे- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. ज्यात एक जण जखमी झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा चाकू लागल्याने शिंदे सेनेचा कार्यकर्ता हा जखमी झाला आहे.वसीम शेख असे जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून पाथरीत प्रथमोपचार करून परभणी येथे हलवण्यात आले आहे. पोलिसानी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील वाद टळला आहे. दरम्यान, पाथरीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बावडा (ता. इंदापूर) येथे पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 7) सकाळी सहकुटुंब मतदान केले. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, कन्या व बावडा लुमेवाडी जि. प. गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अंकिता पाटील ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

तासगाव तालुक्यातील गावात मतदानावर बहिष्कार

सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडेमध्ये मतदानावर बहिष्कार. सोलर प्रकल्पासाठी केलेल्या वृक्षतोडी विरोधात ग्रामस्थांचा निर्णय.

पोलादपूरमध्ये दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढणार

पोलादपूर तालुक्यतील 67 मतदान केंद्रावर सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली असून ग्रामस्थांनी सकाळपासून मतदान करण्यास गर्दी करत आहेत. दुपारनंतर मुंबईतील चाकरमानीही मतदानासाठी पोलादपूरमध्ये येण्याची शक्यता असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील पलचिल बूथवर 75 वर्षीय ज्येष्ठ वयोवृद्ध मतदार यांना व्हीलचेअर द्वारे मतदान केंद्र वर आणण्यात आले. त्याच प्रमाणे इतर बूथवर उमेदवार अजय सलागरे, युगज्ञा उतेकर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. सकाळच्या सत्रात 67 बूथ वर 39 हजार 232 पैकी 3 हजार 780 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये 2 हजार 307 पुरुष मतदारांनी व 1 हजार 473 महिला मतदारांनी आपला हक्क बजावला.

पुणे जिल्हा परिषदेसाठी पहिल्या दोन तासांत ७.७४ टक्के मतदान. 

सर्वाधिक मतदान भोर तालुक्यात झाले . ८.७९ टक्के.

जुन्नर-७.४२ टक्के

आंबेगाव ८.५६ टक्के

शिरूर-७.२१ टक्के

खेड-७.६५ टक्के

मावळ -८.६३ टक्के

मुळशी-७.०३ टक्के

हवेली-७.७९ टक्के

दौंड-८.१२ टक्के

पुरंदर-८.१ टक्के

वेल्हे-७.९१ टक्के

बारामती-६.५२ टक्के

इंदापूर-७.६८ टक्के

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळा बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी चाकरमानी मुंबईतून महाडच्या गावी

महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघात येणाऱ्या सापे वामने रेल्वे स्टेशनवर आज सकाळी मुंबई येथून चाकरमानी मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्याचे चित्र आहे.

राज्यात सकाळी ९.३० पर्यंत ७.८० टक्के मतदान

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी ९.३० पर्यंत ७.८० टक्के मतदान झाले.

रायगड जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत सरासरी ११.०५ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यात आज सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांच्या कालाfवधीत मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शांततेत व सुरळीत मतदान पार पडत असून एकूण ११.०५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पेण (११.३७%), कर्जत (११.२४%), तळा (११.२४%), महाड (११.०२%) व खालापूर (११.१०%) या तालुक्यांतही समाधानकारक मतदान झाले आहे. सुधागड (१०.४९%), उरण (१०.४०%), मुरुड (१०.५७%) व रोहा (१०.३७%) या तालुक्यांमध्ये सरासरी दहा टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.

लातूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात किती मतदान?

लातूर जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत ७.१६ टक्के मतदान.

पनवेलमध्ये पहिल्या दोन तासात किती मतदान?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पनवेल निवडणुक २०२६

सकाळी ७:३० ते ९:३०

एकूण झालेले मतदान : २७९७७६

पहिल्या दोन तासात झालेले मतदान : ३६,३६७

एकूण टक्केवारी : १३ टक्के

संभाजीनगरमध्ये पहिल्या दोन तासात किती मतदान?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतदान टक्केवारी 7.30 ते 9.30 पर्यंत 9.01 % टक्के मतदान.

दौंडमध्ये आ. राहुल कुल व माजी आ. रमेश थोरात यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात आज सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पर्वात दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

Zilla Parishad Elections Live Updates 2026: अलिबाग तालुक्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 12.43 टक्के मतदान झाल्याची नोंद

अलिबाग तालुक्यात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 12.43 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मध्यम असून, पुढील तासांत टक्केवारी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Zilla Parishad Elections Live Updates 2026: महाड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी 11.2 टक्के मतदान झाल्याची नोंद

महाड तालुक्यात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी 11.2 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांची हळूहळू गर्दी वाढताना दिसत आहे.

Zilla Parishad Elections Live Updates 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला

बारामती : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शनिवारी (दि. 7) पहाटे काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.

Zilla Parishad Elections Live Updates 2026: रुद्रराज मोहिते पाटील या लहान मुलाला घेऊन मतदान केंद्रावर 

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपल्या रुद्रराज मोहिते पाटील या लहान मुलाला घेऊन मतदान केंद्रावर. मतदान केंद्राध्यक्षाकडून लहान मुलांना मतदान केंद्रात घेतल्याचा आक्षेप. आईला आणि वडिलांना मतदान करताना बघायचे म्हणून मुलाला आणले असल्याचा अर्जुन सिंह मोहिते पाटील यांचा निर्वाळा.

Parbhani Zilla Parishad Elections Live Updates 2026: परभणीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर मतदान सुरू होण्याअगोदर उमेदवारांनी फोडले मतदान

परभणी ब्रेकिंग

परभणीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर मतदान सुरू होण्याअगोदर उमेदवारांनी फोडले मतदान मशीन

परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलेला आहे. चक्क उमेदवारांनी मतदान सुरू होण्या अगोदर मतदान केंद्राबाहेर नारळ फोडण्याचा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे आता चर्चेला उधान आले आहे. उमेदवार मतदान सुरू होण्याअगोदर नारळ फोडत असताना या ठिकाणचे मतदान केंद्र अधिकारी काय करत होते असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.

Zilla Parishad Elections Live Updates 2026: भाजपाचे उमेदवार पहाटे 3 वाजता पैसे वाटत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे वाल्मीक शिरसाट यांनी केला

छत्रपती संभाजीनगर

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गटात भाजपाचे उमेदवार पहाटे 3 वाजता पैसे वाटत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे वाल्मीक शिरसाट यांनी केला आहे. दरम्यान शिरसाट यांनी वालतुरे यांची गाडी अडवून त्यांना विचारणा केली परंतु वालतुरे तेथून निघून गेले यानंतर शिरसाट यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिलीं.

Kolhapur Zilla Parishad Elections Live Updates 2026:  कोल्हापूरमध्ये मतदानाच्या दिवशी सकाळी भानामती प्रकार केल्याचं समोर

कोल्हापूर

कोल्हापुरातल्या पाचगाव इथल्या पुलावर भानामतीचा प्रकार

मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी पुलावर भानामती प्रकार केल्याचं समोर

नारळ, लिंबू हळदीकुंकू आणि पपई असं साहित्य ठेवून भानामती केल्याचा प्रकार

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026: जिल्ह्यातील पाचोड मध्ये मतदानासाठी प्रचंड रांग

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली जिल्ह्यातील पाचोड मध्ये मतदानासाठी प्रचंड रांग लागलेली पाहायला मिळाली.

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026: खासदार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार...

छत्रपती संभाजीनगर- खासदार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार...

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मी जसा मतदानाचा हक्क बजावला, तसा सर्व जनतेने मतदानाचा हक्क बजावा ,जनतेचा कौल आम्हालाच मिळाला, पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी मतदानासाठी येत आहे, मतदानाची आकडेवारी यावर्षी वाढणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी दिली आहे,

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026: भाजपचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड येथील अंभई गटाचे भाजपचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना नानेगाव येथे शिवसेनेच्या यांच्या कार्यकर्त्या कडून धक्काबुक्की केल्याचा आरोप. याच आंभई गटातून शिंदेंच्या शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार हे निवडणुकीला उभे आहेत.

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 7) मतदान, तर सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026
Mohan Bhagwat Event Celebrities | मोहन भागवतांच्या कार्यक्रमास सलमान, शाहरूख, अंबानी यांच्या उपस्थितीची चर्चा

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला पेनमार्करने लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप झाला होता. हा आरोप टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे बाटलीमधील शाई काडीने लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026
CM Devendra Fadnavis | अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण आता बंद करा

आज शनिवारी मतदान होणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 समित्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मते द्यावी लागणार आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026
Sexual harassment : दादर-मुलुंड लोकल प्रवासादरम्यान अश्लील चाळे करून महिलेचा विनयभंग

2,624 जिल्हा परिषदांच्या सर्व जागांसाठी एकूण उमेदवार

जिल्हा परिषदांच्या एकूण जागा 731

महिला

राखीव 369

अनुसूचित जाती 83

अनुसूचित जमाती 25

ओबीसी 191

Maharashtra Zilla Parishad Elections Live Updates 2026
Acid attack : मोबाईल चोरीसाठी ॲसिड हल्ला : एक गंभीर जखमी

4814 पंचायत समित्यांच्या सर्व जागांसाठी एकूण उमेदवार

एकूण पंचायत समित्या 125

एकूण जागा 1462

महिला राखीव 731

अनुसूचित जाती 166

अनुसूचित जमाती 38

ओबीसी 342

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news