Acid attack : मोबाईल चोरीसाठी ॲसिड हल्ला : एक गंभीर जखमी

कोपरखैरणेतील घटना : जखमी वेदनेने तडफडत असताना ऐवज घेऊन चोरटे पसार
Acid attack
मोबाईल चोरीसाठी ॲसिड हल्ला : एक गंभीर जखमीpudhari photo
Published on
Updated on

कोपरखैरणे : नवी मुंबईत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोज किमान 20 ते 25 मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक सतर्कता बाळगत असताना आता मोबाईल चोरीसाठी ॲसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

नवी मुंबईत मोबाईल चोऱ्या प्रचंड वाढल्या आहेत. चोर वेगवेगळ्या मार्गांनी मोबाईल लांबवत आहेत. आता त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला असून मोबाईल व चीजवस्तू चोरण्यासाठी दोन जणांनी एका व्यक्तीच्या अंगावर ॲसिड फेकले. त्यात तो तडफत असताना त्याच्याकडील मोबाईल , चार हजाराची रोकड, आधारकार्ड असा एकूण सात हजारांच्या ऐवजाची चोरी करून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Acid attack
Express train restriction : पीक अवर्समध्ये एक्स्प्रेस मुंबईबाहेरच थांबवणार

तैय्यब खान हे कोपरखैरणे नोडमधील बोनकोडे गावात राहतात. चार तारखेला रात्री पावणे नऊच्या सुमारास याच परिसरातील नाल्या शेजारील रस्त्यावरून ते पायी जातहोते. सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर ते आले असता विरूद्ध दिशेने एका दुचाकीवरून दोघेजण आले.

यावेळी त्यांनी एक काचेची बाटली बाहेर काढून त्यातील द्रव पदार्थ खान यांच्या अंगावर फेकला. हा द्रव पदार्थ त्यांच्या चेहरा, हात, पोटावर पडल्याने तो भाग भाजला. जिवाच्या आकांताने ते ओरडत असताना चोरट्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता त्यांच्याकडील मोबाईल व खिशातील पैशांचे पाकीट जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. ही घटना अवघ्या काही मिनिटांत घडली.

Acid attack
Raigad ZP Election : मुरुड नगराध्यक्षांच्या शासकीय दालनातून निवडणूक प्रचार

स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठीचे ॲसिड

याबाबत माहिती देताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी सांगितले की, स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे ते ॲसिड होते. मात्र त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस त्या दोन संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news