

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांच्या मोजणी प्रक्रियेअंतर्गत दुसर्या दिवसाअखेर एकूण ७ पेट्यांची मोजणी झाली. यात एकूण ८३ लाख ७४ हजार ६८४ रुपयांची रक्कम देणगी स्वरूपात देवस्थान समितीकडे जमा झाली आहे. यात चिल्लर रक्कम सर्वाधिक असून सुमारे २ लाख रुपयांचे कॉईन, दिनार, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन डॉलर आणि सोन्या-चांदीचे दागिनेे यांचा समावेश आहे.
देवस्थान समितीने मंगळवारपासून मंदिरातील दानपेट्यांच्या मोजणीचे काम सुरू केले. गरुड मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत ही मोजणी सुरू आहे. दोन दिवसांत पेटी क्रमांक ७, ६, ,१ ,२, ८, ९ व १० अशा एकूण सात पेट्यांची मोजणी झाली. पेटी क्रमांक ७ मध्ये ३६ लाख ३१ हजार २०० रुपये, तर उर्वरित सहा पेट्यांत ४७ लाख ४३ हजार ४८४ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. आणखी दोन दिवस मोजणीचे काम सुरू राहील, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, लेखापाल धैर्यशील तिवले व सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोजणी सुरू आहे.
हेही वाचा