महापूर : कवठेसारला पुराचा वेढा
दानोळी; पुढारी वृत्तसेवा : वारणा नदीला महापूर आलेला आहे. परिणामी कवठेसार आणि दानोळीतील ७०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कवठेसार गावाला पाण्याने पूर्ण वेढा दिला आहे. तर दानोळीची फक्त दक्षिण बाजू खुली आहे. इतर तिन्ही बाजूने गावात पाणी शिरत आहे.
अधिक वाचा :
कवठेसार आणि जुने कवठेसार येथील १५० कुटुंबातील ५०० ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे. त्यांची व्यवस्था प्राथमिक शाळा कुंभोज येथे केली आहे.
तर दानोळीतील ५५० कुटुंबातील ३५०० ग्रामस्थांनी दानोळी हायस्कुल आणि आपल्या संबंधित लोकांकडे आपली राहण्याची व्यवस्था केली आहे. हायस्कुलमध्ये २०० ग्रामस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या परिसर जलमय झाला आहे. ऊस, भाजीपाला, फुले या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास दानोळी गावाला सुद्धा पुराचा वेढा पडू शकतो. दरम्यान, काल माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दानोळीत भेट देऊन पाहणी केली असून प्रशासनाला सूचना केल्या.

