‘नीट’ची परीक्षा देताना उच्च ध्येय, परिश्रमाची तयारी ठेवा : प्रा. सेन्मा
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार वाढला आहे. या क्षेत्रात करिअर करण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याद़ृष्टीने 'नीट' परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, परिश्रम करण्याची तयारी ठेवावी 'एनसीआरटीई' पुस्तकांचा सखोल केल्यास वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी करिअर करणे शक्य आहे, असे प्रतिपादन आआयबी, पीसीबी क्लासेस लातूरचे संचालक प्रा. चिराग सेन्मा यांनी केले.
दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'एज्युदिशा-2022' शैक्षणिक प्रदर्शनात 'नीट'ची तयारी कशी करावी याविषयावर ते बोलत होते. प्रा. सेन्मा यांनी 'नीट' परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, तयारी कशी करावी, याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. ते म्हणाले, 'नीट'ची परीक्षा 720 गुणांची असून चार विषय असतात. प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना चॅप्टर, युनिट आणि व्होल कव्हर्सप्रमाणे केल पाहिजे.
नवी पिढी हुशार असून त्यांच्यात कष्ट करण्याची तयारी नाही. त्यांच्याकडून कष्ट करुन घेण्याची तयारी शिक्षकांनी ठेवणे गरजेचे आहे. दहावीला चांगले मिळाले म्हणजे तो विद्यार्थी 'नीट' परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईलच असे नाही. त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, मार्गदर्शनाची जोड असणे गरजेचे आहे. 'आयआयबी'च्या वतीने नीटसाठी खास विद्यार्थ्यांसाठी सोय केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची व्यवस्थित तयारी करून घेतली जाते. प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक आहेत.
भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टरांची मोठी आवश्यकता भासत आहे. कोरोनानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केल्यास त्यास चांगले दिवस आहेत. देशात चांगल्या प्रकारे प्रॅक्टीस करून ग्रामीण भागात सेवा करण्याची संधी डॉक्टर बनल्यावर मिळेल, असे प्रा. सेन्मा म्हणाले.