कोल्‍हापूर : केंद्र शाळा धामोडमध्ये डॉ. अब्दुल कलाम जयंती आणि वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा

वृत्तपत्र विक्रेता दिन
वृत्तपत्र विक्रेता दिन

धामोड; पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथे डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार असलेले निर्भीड वृत्तपत्र दै. पुढारीचा इतिहास व पुढारीचे सामाजिक कार्य या विषयी सहाय्यक शिक्षक एस एल कुंभार यांनी विद्यार्थांना माहिती दिली. भारताचे अग्नीपंख माजी राष्ट्रपती स्व डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करून देशाच्या जडणघडणीत असलेले डॉ. कलाम यांचे योगदान याबद्दल त्यांनी माहिती दिली.

डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनी साजरा केला जाणारा वाचन प्रेरणा दिन व पुस्तक आपले मित्र व वृतपत्र विक्रेता दिन या विषयी केंद्र मुख्याद्यापक के. एच. ठिपकुर्ले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी वेगवेगळे दाखले देत त्‍यांनी विद्यार्थांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेते संग्राम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या हस्ते दै. पुढारीच्या अंकांचे वितरण करण्यात आले. यावेळी पी. एच. पाटील सर, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष संदिप नलवडे, विठ्ठल पाटील, संग्राम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news