कोल्हापूर : फटाके उडवले म्हणून तलवारी उपसल्या; दोन गटांत तुंबळ हाणामारी

File Photo
File Photo
Published on
Updated on

मजरेवाडीत दगडफेकीत युवती,तर तलवार लागून तरुण गंभीर जखमी

कुरूंदवाड : पुढारी वृत्तसेवा मजरेवाडी (ता. शिरोळ) येथे पालखी मिरवणुकीसमोर फटाके उडवण्यासाठी मज्जाव केल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. परस्परांवर तुफान दगडफेकीबरोबरच हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका माजी सरपंचाने एका महिलेच्या श्रीमुखात भडकावल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. ही घटना शनिवारी पहाटे 4 च्या पान 4 वर सुमारास घडली आहे. या हाणामारीला साहेब ग्रुप व सरकारप्रेमी या दोन ग्रुपमधील राजकीय वादाची झालर आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांची नावे समोर आली असून, 21 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मजरेवाडी येथे एका मंडळात निवडणुकीदरम्यान सरकार व साहेब ग्रुप असे दोन गट पडले आहेत. गावात लक्ष्मीदेवीची यात्रा सुरू असून, शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास देवीची पालखी मिरवणूक सरकार-साहेब चौकात आल्यानंतर एक गट फटाके उडवत होता. त्यांना दुसर्‍या गटाने मज्जाव केला. त्यातूनच वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारी व दगडफेकीत झाले.

दोन्ही गटांतील काही तरुणांनी नंग्या तलवारी आणून दहशत माजवली. या झटापटीत राजेंद्र कागले याच्या डोक्यावर तलवारीचा वार झाला. तर दगडफेक सुरू झाल्याने आपल्या वडिलांना घेण्यासाठी आलेल्या आसावरी ढोणे या युवतीच्या पायाला दगड लागला. कागले याच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिने स्टाईलने तब्बल 2 तास सुरू असलेली हाणामारी गावातील प्रतिष्ठितांनी मध्यस्थी करून थांबवली. पुन्हा पहाटे चार वाजता काही युवकांनी सरकार ग्रुपच्या आयलँडवर हल्ला चढवत फरशा फोडल्या. त्यामुळे पुन्हा वादावादी सुरू झाली. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देताच स.पो.नि. बालाजी भांगे, अमित पाटील यांनी जमाव पांगवत 11 जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. संध्याकाळपर्यंत पोलिसांनी 21 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news