किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा. ‘जय भवानी… जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड

 किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड
किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड
Published on
Updated on

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा
किल्‍ले पन्हाळगडावर छत्रपती ताराराणी महाराज यांच्या राजवाड्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने व शाही थाटात 395 वा छत्रपती शिवाजी महाराज जन्मकाळ सोहळा साजराझाला.

सोहळ्यासाठी पन्हाळगडावरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी शिवरायांचा पाळणा गायिला. ज्येष्ठ नागरिक अनंत हवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान दिले. आरतीनंतर परंपरेप्रमाणे सुंठवडा वाटप करण्यात आले. शिवजन्मोत्सव काळ सोहळ्यात अबालवृद्ध सहभागी झाले होते.दरम्यान, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक ठिकाणी 1375 शिवजोती पन्हाळगडावरून प्रज्वलीत करून नेण्यात आल्या. रात्रभर पन्हाळगडच्या पर्यायी रस्त्यावरून शिवभक्‍त मावळे शिवाजी महाराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन धावत होते. सर्व मावळ्यांना पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र व श्रीफळ देण्यातआले. शिवजयंतीनिमित्त पन्हाळा युवा प्रतिष्ठान आयोजित रक्‍तदान शिबिरात 86 जणांनी रक्‍तदान केले. संजीवन नॉलेज सिटीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्याने शिवजयंती साजरी झाली.

संस्थापक पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य महेश पाटील, उपप्राचार्य पी. एन. पाटील, उपप्रचार्या शिल्पा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शाहीर पांडुरंग कुंभार यांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा पोवाडा सादर केला. हा सोहळा छत्रपती शिवरायांच्या शिवगर्जनाने पन्हाळगडाच्या पायथ्याशी कडेकपारीत आवाज घुमला.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news