Kolhapur Crime : पाण्याच्या वादातून तरूणाचा धारदार शस्राने खून, एक गंभीर

हरोली येथे घटना; जखमीवर उपचार सुरू
Kolhapur Crime News
पाण्याच्या वादातून तरूणाचा धारदार शस्राने खून
Published on
Updated on

शिरोळ : हरोली (ता.शिरोळ) येथे पाण्याच्या वादातून एकाचा धारदार शस्राने खून करण्यात आला तर एकजण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि.१९) सायंकाळी घडली. विजय एकनाथ मुघलखुडे (वय ४६, रा. हरोली ता. शिरोळ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

Kolhapur Crime News
Kolhapur Crime : दरोड्याची बनवाबनवी! दागिन्यांसाठी पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, आजऱ्यातील प्रकरणाचा काही तासात उलगडा

हल्लेखोरांनी धारदार शस्राने केलेल्या हल्ल्यात अजय कांबळे हा तरूणही गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिसात झाली नव्हती. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर काहींनी संशयित गुजरे याच्या घरावर दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर हरोली गावात खळबळ माजली आहे. गावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. संशयित गुजरे याच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News | लग्नाच्या आमिषाने घटस्फोटित महिलेवर अत्याचार; १०.९४ लाख रुपये उकळले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news