लक्ष्मीपूजनादिनी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात श्री अंबाबाई सजली

लक्ष्मीपूजनादिनी गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात श्री अंबाबाई सजली
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आज अश्विन कृष्ण चतुर्दशी युक्त अमावस्या अर्थात दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई आरती आपली कन्या स्वरुपिणी अशा गजेंद्र लक्ष्मीच्या रूपात सजली आहे. महर्षी दुर्वासांना जगदंबेने प्रसाद रूप अशी पुष्पमाला दिली. हा प्रसाद एखाद्या वैभवशाली आणि अधिकारी व्यक्तीकडे असावा म्हणून त्यांनी ती पुष्पमाला ऐरावतावरून चाललेल्या इंद्राकडे दिली. इंद्राने तो पुष्पहार आपला हत्ती ऐरावत याच्या गळ्यात घातला.

त्यामुळे रागावलेल्या ऋषीनी इंद्राला शाप दिला. ज्या वैभवाच्या मदाने ते देवीप्रसादाचा अपमान केलास. ती त्रिभुवनाची सगळी लक्ष्मी क्षीरसमुद्रात बुडून जाऊ दे. दुर्वासांच्या शापानुसार सर्व देव श्री विहीन झाले. ऋषींचा शाप सर्व देवांना प्रभावित करणारा असल्याने नारायणाची पत्नी आणि सर्वस्या द्या. अंबाबाईची कन्या असणारी कमला लक्ष्मी सुद्धा क्षीरसमुद्रामध्ये विलीन झाली. तेव्हा भगवान नारायणाच्या सल्ल्याप्रमाणे देवांनी त्यांच्या मदतीने सागर मंथन करायचे ठरवले.

मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक बाहेर येणाऱ्या रत्नांना त्यांची मूळ जागा प्राप्त होऊ लागली. अशातच हिरण्यवर्णा म्हणजे सुवर्णकांतीची चतुर्भुजा लक्ष्मी प्रगट झाली. तिच्या हातामध्ये हेमकुंभ कमळ वरद मुद्रा कमलासनावर विराजमान अशी सालंकृत लक्ष्मी पाहून आठ दिशांना तोलून धरणाऱ्या ऐरावत पुंडलिक वामन कुमुद सुप्रतिक अशा आठ दिग्गजांनी म्हणजे आठ हत्तींनी तिच्यावर सोंडेत अमृतकलश घेऊन अभिषेक केला.

लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये तिला अभिषेक करून अभिवादन करणाऱ्या प्रतिक रूप अशा हत्तींचे चित्रण केले जाते. आज करवीर निवासिनी आपल्या याच लाडक्या लेकीच्या रूपात सजली आहे. ही धनलक्ष्मी आपणा सर्वांना अष्टेश्वरीय देऊन सर्व प्रकारची समृद्धी उत्तम आरोग्य आणि जगदंबा चरणी दृढ भक्ती देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news