

Company Store Fire
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल.क.अकीवाटे औद्योगिक सहकारी वहसातीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेचार सुमारास टेक्नॉव्हिजन कंपनीच्या स्टोअरला भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जयसिंगपूर शिरोळ येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली नव्हती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी उदगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्नॉव्हिजन कंपनीच्या स्टोअरला अचानकपणे सोमवारी सायंकाळी आग लागली. सुरुवातीला आग आटोक्यात प्रयत्न सुरू केले मात्र आग इतकी भयंकर होती की नागरिकांमध्ये मोठी धाकधूक पसरली होती.
तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आज भिजवण्याचे काम सुरू केले. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली.
या आगीच्या घटनेमुळे जयसिंगपूर उदगाव परिसरात धुराचे लोट पसरले होते. रात्री उशिरा पर्यंत याबाबतची नोट जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती.