पावनगडच्या पायथ्याशी राक्षी जंगलात आढळले दोन मृत गवे

पावनगडच्या पायथ्याशी राक्षी जंगलात आढळले दोन मृत गवे

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : पावनगडच्या पायथ्याला असणाऱ्या धबधबेवाडी येथील राक्षी वनक्षेत्र परिसरात शुक्रवारी (दि.29) सकाळी दोन वृद्ध गवे मयत अवस्‍थेत आढळून आले. याबाबतची माहिती पन्हाळा वनपरिक्षेत्रचे वनपाल विजय दाते यांनी दिली.

वनपाल दाते म्हणाले की, वनरक्षक संदीप पाटील, अमर माने, पांडुरंग पाटील, यशवंत पाटील, तानाजी लवटे हे राक्षी वनक्षेत्र भागात गस्त घालत असताना गणेश तळी व उंबर माळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंगलातील ठिकाणावर एक नर व मादी गवा मृतावस्थेत आढळून आला. वनरक्षक पाटील यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, वनपाल विजय दाते हे तात्‍काळ घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृत गव्यांचा पंचनामा केला. दरम्‍यान दोन्ही गवे हे वृद्ध झाले असल्याने मयत झाले असावेत असे अनिल मोहिते यांनी माहिती दिली.

पन्हाळा परिसरात पावनगडच्या जंगलामध्ये सुमारे साठ गव्यांचा कळप असून या कळपा मधीलच दोन गवे मृत झाल्‍याची ही पहिलीच वेळ आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी म्‍हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news