Kolhapur Flood | महामार्गावर वाहतूक कोंडी; तावडे हॉटेलपासून सांगली फाट्यापर्यंतचा प्रवास तासाभराचा

सांगली फाट्याजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Kolhapur Flood
पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सतत पडणाऱ्या पावसामुळे महामार्गावर शनिवारी मोठी कोंडी झाली. नागाव फाट्यापासून गोकुळ शिरगावपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. सांगली फाट्याजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. (Kolhapur Flood )

Kolhapur Flood
Kolhapur Flood News : ५४ तासानंतर कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला

महामार्गाच्या दोन्ही बाजूला नजर जाते तिथेपर्यंत पाणी दिसत आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे खोदाई करण्यात आली आहे. यामुळे कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

त्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. काम सुरू असल्याने काही ठिकाणी वळण रस्ते काढण्यात आले आहे. त्याठिकाणीही दलदल झाली आहे. रस्त्याच्या कडेला पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.

Kolhapur Flood
Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४

तावडे हॉटेलपासून सांगली फाट्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे पाऊण तास प्रतीक्षा करावी लागते. नागाव फाट्यापासून गोकुळ शिरगावपर्यंत वाहनांच्या दिवसभर रांगा लागल्या आहेत. G0005 ALL IND पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शिरोली येथील निम्मा दर्गा पाण्यात गेला आहे. सांगली फाट्याजवळ सेवा रस्त्यावर पाणी आल्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी मंगल कार्यालय, दुकाने तसेच हॉटेल, वाहन दुरुस्तीची गॅरेज व धाब्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुची शेती संपूर्ण पाण्याखाली गेली आहे. वाहतूक बंद करण्यात आलेल्या मार्गावर बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. त्यातून काही वाहनधारक मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. काही ठिकाणी महामार्गाच्या कडेला पुराचे पाणी येऊन टेकले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news