Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४

साप्‍ताहिक राशीभविष्‍य, २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४
Weekly Horoscope
Weekly Horoscope
Published on
Updated on

Weekly Horoscope | होराभूषण रघुवीर खटावकर : हा सप्ताह वृषभ, कन्या, तुळ, कुंभ राशिगटाला उत्तम तर मेष, सिंह, धनु राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश : दि. ३१ - शुक्र सिंहेत १४/३३. महत्त्वाचे ग्रहयोग : दि. २ ऑगस्ट - शुक्र केंद्र हर्षल. वक्री ग्रह : शनि, नेपच्यून, प्लुटो. मार्गी ग्रह : दि. २८ पासून बुध.

मेष : घरगृहस्थीची काळजी

Weekly Horoscope
मेष File Photo

मेष : रवि शु. ३१ पर्यंत चौथे. घरगृहस्थीतील समस्यांमुळे तात्पुरती काळजी वाटेल. विवाह जुळू शकेल. शिक्षणातील अडचणी दूर करा. मणक्याचे त्रास जाणवतील. परदेशगमन घडेल. सप्ताहाच्या सुरुवातीला उत्साहाने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी नेहमीच्या कामात शिथिलता येईल.

वृषभ : प्रॉपर्टीत गुंतवणूक करा

Weekly Horoscope
वृषभFile Photo

वृषभ : रवि शु. (३१ प.) तिसरे. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. कामात यश मिळेल. जाहिरात प्रदर्शने, मार्केटिंगकडे लक्ष द्याल. पशुधन लाभेल. पोटाची तक्रार जाणवेल. अधिकार गाजवाल. विवाह जुळेल. प्रलोभने टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. यशाची खात्री नसेल. रेंगाळलेली कामे एक-दोन दिवसांत उत्साहाने पार पाडाल. कौटुंबिक गरजा भागवाल. कामासाठी धावपळ करून यश मिळावाल.

मिथुन : भाऊबंदकी जाणवेल

Weekly Horoscope
मिथुनFile Photo

मिथुन : रवि शु. (३१ प.)दुसरे. भाऊबंदकी जाणवेल. आर्थिक प्राप्ती चांगली, पण कष्टाने होईल. जामीन राहू नका. धंद्यात शत्रू निर्माण होतील. कायदेशीर बाबी सांभाळा. परदेशगमन घडेल. भावंडांना कष्ट जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस सरकारी संकटांना सामोरे जावे लाभेल. कामे रेंगाळली तरी दोन दिवसांत पूर्ण कराल. कुटुंबाकडे लक्ष द्याल.

कर्क : भावनावेग आवरा

Weekly Horoscope
कर्कFile Photo

कर्क : रवि शु.(३१ प.) पहिले.पित्ताचा त्रास होईल. भावनावेग आवरा. घशाचे विकार जाणवतील. विवाह जुळेल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. विलंब, अडचणी अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मित्रासमवेत करमणुकीत वेळ जाईल. आर्थिक लाभ होतील. कामे रेंगाळली तरी सप्ताहाच्या अखेरीस पूर्ण कराल.

सिंह : स्वभाव खर्चिक बनेल

Weekly Horoscope
सिंहFile Photo

सिंह : रवि शु. (३१ प.) १२ वे. स्वभाव खर्चिक बनेल. बोलण्याने कामे बिघडतील. मानसन्मान लाभेल. पण गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील. अंतर्मुख होऊन कामातील त्रुटी दूर करा. सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. शेवटी थोडा खर्चही वाढेल.

कन्या : आर्थिक प्राप्ती चांगली

Weekly Horoscope
कन्याFile Photo

कन्या : रवि शु. (३१ प.) ११ वे. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. मित्रामुळे अडचणीत याल. स्वभाव खर्चिक बनेल. परदेशगमनाची संधी लाभेल. नावलौकिक वाढेल. विवाह ठरतील. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी-पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मित्रांचा सहवास लाभेल. करमणुकीत वेळ जाईल.

तूळ : कामे यशस्वी होतील

Weekly Horoscope
तूळ File Photo

तूळ : रवि शु. (३१ प.) १० वे. प्रयत्नांनी यश मिळवण्याची क्षमता राहील. खरेदी-विक्री वाढेल. पण दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. मित्रामुळे अडचणीत याल. भावनिक दडपण राहील. यशासाठी आग्रही रहाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचे समाधान लाभेल. आर्थिक लाभ होतील. एक-दोन दिवस खर्चाचे, चिडचिडीचे, सर्दी पडसेेचे जातील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

सामाजिक कार्यात सहभाग

Weekly Horoscope
वृश्चिकFile Photo

वृश्चिक : रवि शु. (३१ प.) नववे. सामाजिक कार्यात सहभाग राहील. धार्मिक मंगळ कार्यासाठी प्रवास घडेल. नवीन वस्त्रे मिळतील. मानसिक संतुलन राखा. धंदा व्यवसायत मोठ्या उलाढाली होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. मोबदला कमी मिळेल. एक-दोन दिवस सहकार्याचे जातील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.

धनु : विपरीत घटनेतून लाभ

Weekly Horoscope
धनुFile Photo

धनु : रवि शु. (३१ प) आठवे. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामासाठी प्रवास घडेल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. घरगृहस्थीत गैरसमज, मतभेद जाणवतील. कामाचे श्रेय कमी मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीचा सहवास लाभेल. आव्हानात्मक कामे कराल. विपरीत घटनेतून लाभ होईल. सहकार्याने कामे कराल. विपरीत घटनेतून लाभ होईल. सहकार्याने कामे होतील. शेवटी थकवा जाणवेल.

मकर : भावनिक दडपण

Weekly Horoscope
मकरFile Photo

मकर : रवि शु. (३१ प.) सातवे. भावनिक दडपण राहील. गुप्त कारवायांचा त्रास अनुभवतो. विवाह जुळेल. मित्रांच्या विचारांचा प्रभाव राहील. भावंडांशी वाद टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संतती सुख लाभेल. कामे होतील. पण मोबदला कमी मिळेल. सप्ताहाच्या शेवटी प्रवास घडेल. कामात यश मिळेल.

कुंभ : कामात यश

Weekly Horoscope
कुंभFile Photo

कुंभ : रवि शु. (३१ प.) सहावे. कामात यश मिळत जाईल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. भावनिक दडपण राहील. कौटुंबिक खर्च व समस्या जाणवतील. विलंब, अडचणी अनुभवाल. विपरीत घटनातून लाभ संभवतो. सप्ताहाची सुरुवात गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळीत जाईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीचा सहवास लाभेल. शेवटी वाद टाळा.

मीन : कला क्षेत्राकडे ओढा

Weekly Horoscope
मीनFile Photo

मीन : रवि शु. (३१ प.) पाचवे. शिक्षणापेक्षा कला क्षेत्राची ओढ जास्त राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. कर्म बलवान राहील. मनाचा गोंधळ उडेल. भावंडांच्या प्रगतीसाठी झटाल. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा भागवा. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ येईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. सप्ताहाच्या शेवटी संततीचा सहवास लाभेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news