Kolhapur Flood News : ५४ तासानंतर कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला

कूर येथे पूर ओसरल्याने 'गारगोटी-कोल्हापुर राज्य मार्ग वाहतुकीसाठी खुला
Kolhapur-Gargoti highway Open for traffic after 54 hours
Kolhapur Flood News : ५४ तासानंतर कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गवर वाहतुकीसाठी खुला Pudhari Photo
Published on
Updated on

कोनवडे : राम देसाई

गेली सात दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने काल (शनिवार) रोजी विश्रांतीनंतर पुरस्थिती कमी होत चालली आहे. त्यामुळे पुराचे पाणी कमी होत चालले आहे . आज ( दि .२८ ) रोजी सकाळी नऊ वाजता तब्बल ५४ तासानंतर खुला करण्यात आला आहे. सध्या मडीलगे बुद्रुक-कुर दरम्यानच्या रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत चालु आहे. पावसाचा जोर कमी आल्याने महापुराचे पाणी कमी होत आहे.

Kolhapur-Gargoti highway Open for traffic after 54 hours
Kolhapur Rain Updates | शाहूवाडीत १४१ मालमत्तांची पडझड ; ६३ लाखांचे नुकसान

सध्या पाटगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी आल्याने धरण ९७ .३४ % भरले असुन धरणातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालु आहे. कोंडोशी प्रकल्प १०० % भरला असुन १०० क्युसेकने विसर्ग चालु आहे.

Kolhapur-Gargoti highway Open for traffic after 54 hours
Kolhapur Flood | शहरात पूरस्थिती बिकट; प्रमुख पाच रस्ते बंद

गेली आठवडाभर कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पुरIस्थिती कायम आहे. पुराचे पाणी पिकामध्ये राहिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पिके कोलमडुन गेली आहेत. त्यामुळे नदीकाठ्याच्या पिकांबरोबर शिवारातील ऊस पिकाच्या नुकसानीने शेतकरी चिंताक्रात आहे. तसेच सोसाट्याच्या वाऱ्याने विद्युत तारा तुटुन विजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोनवडे, नाधवडे, टिक्केवाडी, कुर येथील नागरिकांना वारंवार विद्युत खंडीतचा त्रास सहन करावा लागला.

Kolhapur-Gargoti highway Open for traffic after 54 hours
पंचगंगा पाणी पातळी 1 इंचने कमी, पाऊसही ओसरला

आठवडाभर पडणाऱ्या पावसाने शेत शिवारात तसेच नदी, नाले भरून वाहत आहेत. यामुळे पाटगाव धरणावरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर गेल्याने पुरस्थितीवर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलीस स्टेशन, महसुल विभाग लक्ष ठेवुन नागरिकांना वेळोवेळी सुचना देत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news