कोल्हापूर: म्हाकवे येथील हायस्कूलमध्ये चोरी

कोल्हापूर: म्हाकवे येथील हायस्कूलमध्ये चोरी
Published on
Updated on

म्हाकवे; पुढारी वृतसेवा : येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल या शाळेच्या दरवाजाची कडी कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या चोरीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत कागल पोलीस स्टेशनमध्ये आज (दि.१०) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवेमध्ये गुरूवारी रात्री चोरट्यांनी मुख्याध्यापक केबीन, प्रयोगशाळेच्या दरवाजाची कडी कोंयडे तोडून चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये प्रयोगशाळेतील साहित्य विस्कटून टाकण्यात आले. तर यातील काही साहित्य शाळेच्या व्हरांड्यामध्ये आणून टाकले. पोलिसांनी श्वानपथक मागवले. श्वानाने शाळे बाहेरील मुख्य रस्त्यापर्यंत मार्ग दाखवून श्वान तेथेच घुटमळले. दरम्यान, पोलिसांनी ठसे तज्ञांना प्राचारण केले. दरम्यान, चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या खोलीतील महत्त्वाची कागदपत्रे गायब केल्याची चर्चा आहे. याबाबतची फिर्याद मुख्याध्यापक पी. बी. भारमल यांनी कागल पोलिसात दिली. अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news