कुरुंदवाड : विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड ग्रा.पं.सारखा ठराव प्रत्येक ग्रा.पं.ने करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कुरुंदवाड : विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाड ग्रा.पं.सारखा ठराव प्रत्येक ग्रा.पं.ने करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
विधवा प्रथा बंद करण्याचा हेरवाडचा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरुष समानतेची घटना लिहली अन् या घटनेच्या परंपरेचा मोती हेरवाडकरांनी केल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काढले. या ठरावाचा कायद्या करण्यासाठी जनमताच्या आधाराची गरज आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने हा ठराव करावा असे, आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. गावातील महिला भवन उभारणीसाठी ११ लाखांचा निधी देत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा महिला प्रथा बंद करण्याच्या केलेल्या क्रांतिकारी ठरावाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हेरवाड ग्रामपंचायतीची भेट दिली. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख वैभव उगळे, तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा धुमाळ-मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवीतके, सरपंच सुरगोंड पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील यड्रावकर म्हणाले, राजश्री शाहू महाराजांनी आपल्या समाजातील वंचित घटकांना न्याय दिला. त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हेरवाड गावाने जपला आहे. संपूर्ण देशात या गावाने आदर्श निर्माण करून विधवा महिलांचा सन्मान केला आहे. स्त्रियांना समान वागणूक मिळण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, असे उद्गगार काढले.  ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाबद्दल हेरवाड गावाला ५० लाखांचा निधी जाहीर केला.

यावेळी सरपंच पाटील व ग्रामविकास अधिकारी श्रीमती पी .आर कोळेकर, उपसरपंच विकास माळी, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, जि.प. सदस्या स्वाती सासणे, झेलमताई जोशी, सुनिता मोरे, मंगल चव्हाण,नंदकुमार लोंढे, प्रविण सोनवणे, कमलादेवी बोराडे, आर.बी. पाटील आदी उपस्थित होते.

व्हिडीओ पाहा : "नवनीत राणांची सिनेमात अधिक प्रगती होईल" – डॉ. नीलम गोऱ्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news