

कोल्हापूर : माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व शांतादेवी डी. पाटील यांचे नातू, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे पुतणे आणि माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज डी. पाटील व प्रतिमा पाटील यांचे सुपुत्र तेजस आणि सुहासराव आनंदराव पाटील व वनश्री पाटील यांची कन्या स्नेहा यांच्या विवाहाप्रित्यर्थ मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भव्य स्वागत समारंभ मंगळवारी थाटात पार पडला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, विजय पाटील, पी. डी. पाटील, अजिंक्य पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीयमंत्री अन्नपूर्णा देवी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उपनेते खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, मंत्री एच. के. पाटील, गोव्याचे मंत्री दिगंबर कामत, बाळासाहेब थोरात, खा. प्रणिती शिंदे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले, आ. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, आ. अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, संभाजीराजे छत्रपती, आ. नीलेश राणे, खा. पार्थ पवार आदी उपस्थित होते.