

कोल्हापूर : माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील व शांतादेवी डी. पाटील यांचे नातू, डी. वाय. पाटील ग््रुापचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे पुतणे आणि माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषदेचे काँग््रेासचे गटनेते आमदार सतेज डी. पाटील व प्रतिमा पाटील यांचे सुपुत्र तेजस आणि सुहासराव पाटील व वनश्री पाटील यांची कन्या स्नेहा यांचा विवाह सोहळा मंगळवारी सायंकाळी पोलिस ग््रााऊंड येथे शाही थाटामाटात झाला.
खा. शाहू महाराज, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, सौ. गीतादेवी प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, डॉ. सौ. स्मितादेवी योगेश जाधव, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग््रुापचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, उद्योगपती संजय घोडावत, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, याज्ञसेनी महाराणी, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, आमदार जयंत पाटील, काँग््रेासचे आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार सर्वश्री अतुल भोसले, प्रा. जयंत आसगावकर, विनय कोरे, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, माजी खा. जयवंतराव आवळे, माजी खा. राजू शेट्टी, माजी खा. प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, समरजित घाटगे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी नवदाम्पत्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांचे स्वागत डॉ. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, राजेश खडके, देवराज पाटील, निशांत पाटील, सुशांत पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रतापराव चव्हाण-पाटील, सौ. सुप्रिया प्रतापराव चव्हाण-पाटील, मेघराज काकडे, सौ. राजश्री काकडे, डॉ. विजय डी. पाटील, सौ. शिवानी विजय पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, सौ. पूजा अजिंक्य पाटील, डॉ. प्रदीप पालशेतकर, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, रश्मिन चोलेरा, अनिल मोरे, अजय आवटे, सोमनाथ पाटील, भरत चव्हाण-पाटील, करण काकडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.