कोल्हापूर : केदारकंठ शिखरावर ‘समिट’च्या गिर्यारोहकांनी फडकविले ७४ तिरंग्यांचे तोरण

कोल्हापूर : केदारकंठ शिखरावर ‘समिट’च्या गिर्यारोहकांनी फडकविले ७४ तिरंग्यांचे तोरण
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : समिट ॲडव्हेंचरच्या २३ गिर्यारोहकांच्या चमूने उत्तरांचलमधील १३ हजार फूट उंचीचे 'केदारकंठ' शिखर नुकतेच सर केले. ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ७४ राष्ट्रध्वजांची पताका केदारकंठवर फडकावून समिट ॲडव्हेंचरने एक आगळीवेगळी मानवंदना देशाला अर्पण केली. या चमूत १७ वर्षाच्या निमिष लवटे, ७० वर्षाचे डॉ. हणमंत पाटील यांच्यासह १० महिलांचा सहभाग होता.

'समिट'च्या गिर्यारोहकांनी ११.३० वाजता सुरु केलेली चढाई दुपारी ४.०० वाजता केदारकंठ सर करून पूर्ण केली. आणि प्रजासत्ताकच्या पूर्व संध्येला चढाई करण्याचा मानस एक दिवस आधीच पूर्ण केला.

केदारकंठ उत्तरांचलच्या पश्चिम भागात डेहराडूनमधील सांक्री तालुक्यात स्थित आहे. हा प्रदेश हिमाचल, यमनोत्री आणि गंगोत्रीशी हिमालयातील विविध पासेस च्या माध्यमातून जोडला जातो. या भागाला स्वर्गारोहिणी, ब्लॅक पीक, बंदरपुछ अशी हिमालयातील पर्वत शृंखला लाभलेली आहे. उंचीच्या दृष्टीने हे शिखर फार उंच नाही. तांत्रिक चढाईची कोणतीही साधने न वापरता या शिखरावर चढाई करता येते; परंतु हिवाळ्यामध्ये या शिखरावर चढाई करणे वातावरणीय दृष्टिकोनातून खूपच अवघड असते.

या मोहिमेत समिट ॲडव्हेंचर्सचे समीर गंगातीरकर, निशांत लवटे, निमिष लवटे, राहुल लिंग्रस, धनाजी पोवार, अमित माटे, डॉ. हर्षवर्धन जोशी, डॉ. निशांत कालेल, डॉ. सुनील खट्टे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. दीपक जोशी, स्वरूपा कोरगांवकर, प्रीती तांबडे, स्नेहा शेडबाळे, माधवी शेडबाळे, पूजा खोत, शुभांगी भोकरे, नितु करंजुले, सरिता पाटील, वर्षा गुंजाळ, डॉ. हणमंत पाटील (वय ७०) आणि डॉ. प्रतिभा शिंदे ( वय ६० रा. आटपाडी) यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी केले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news