Kolhapur accident News | शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर दोन कारचा भीषण अपघात, वेळीच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला

शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, दत्त कारखान्याचे व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह एकजण जखमी
Kolhapur accident News | शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर दोन कारचा भीषण अपघात, वेळीच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला
Published on
Updated on

Major head on collision between two cars on Shirol Nrusinhawadi road

नृसिंहवाडी : शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील हनुमान मंदिराजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ, दत्त कारखान्याचे व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह एकजण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.5 मे) संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेडशाळचे सरपंच सुनील संकपाळ आणि बाळू माणकापुरे हे आपल्या 'MH 10 DQ 3760' या कारमधून शिरोळहून नृसिंहवाडीच्या दिशेने जात होते. याच वेळी नृसिंहवाडीकडून शिरोळकडे जाणाऱ्या 'MH 12 SE 6325' या कारने त्यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Kolhapur accident News | शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर दोन कारचा भीषण अपघात, वेळीच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला
Kolhapur Accident : विद्यार्थी बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक; १४ जखमी, चौघांची स्थिती गंभीर

या अपघातामध्ये सरपंच सुनील संगपाळ आणि बाळू माणकापुरे हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कारमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक हे किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनातील एअरबॅग वेळीच उघडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Kolhapur accident News | शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर दोन कारचा भीषण अपघात, वेळीच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला
Kolhapur Accident | कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर ट्रक-कारची भीषण धडक; साताऱ्याचे कदम कुटुंब अपघातात जखमी

या अपघातामध्ये सरपंच सुनील संगपाळ आणि बाळू माणकापुरे हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या कारमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक हे किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनातील एअरबॅग वेळीच उघडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Kolhapur accident News | शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर दोन कारचा भीषण अपघात, वेळीच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला
Washim Accident | नागपूर–संभाजीनगर महामार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार, एक जण गंभीर जखमी

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील वाहतूक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news