Kolhapur Accident : विद्यार्थी बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक; १४ जखमी, चौघांची स्थिती गंभीर

औरवाड–कवठेगुलंद मार्गावर अपघात
Kolhapur Accident
Kolhapur Accident
Published on
Updated on

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड–कवठेगुलंद मार्गावर विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यातील ४ जणांची स्थिती गंभीर आहे. या ४ जणांना शिरोळ येथील शतायु अतिदक्षता मध्ये दाखल करण्यात आले आहे तर १० जणांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

हा अपघात इतका भीषण होता की, विद्यार्थी वाहतूक बसच्या पुढच्या चाकाची धडी निखळून मागे सरकली, तर क्रूझरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. औरवाड पुलापर्यंत तसेच कवठेगुलंद माळापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. टनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल,हुजेफ जमादार, शरद पवार, मुज्जमामील पटेल, निलेश बने, आतिष बने यांनी प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news