Satyajit Patil | गोकुळ निवडणुकीत शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत; सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणार : सत्यजित पाटील

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातून गोकुळ निवडणुकीसाठी कुटुंबातील सदस्यांचा अर्ज दाखल न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणार
Satyajit Patil Sarudkar on Gokul Election
Satyajit Patil Sarudkar on Gokul ElectionPudhari
Published on
Updated on

Satyajit Patil Sarudkar on Gokul Election

सरूड : कोल्हापूर जिल्हा दूध (गोकुळ) संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सक्रिय पाठिंबा देत ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतल्याची माहिती माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दिली.

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातून गोकुळसाठी कुटुंबातील सदस्यांचा अर्ज दाखल न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याचेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यापूर्वी स्वतंत्रपणे ठराव दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्व ठरावधारक, दूध उत्पादक, दूध संस्था, कामगार आणि कार्यकर्त्यांसोबत आघाडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Satyajit Patil Sarudkar on Gokul Election
Gokul Election : संभाजी पाटील, मुरलीधर जाधव यांचा एक अर्ज बाद

या चर्चेत बहुतांश ठरावधारक व कार्यकर्त्यांनी दूध उत्पादक, दूध संस्था आणि कामगारांच्या हितासाठी समविचारी आघाडीला पाठिंबा देण्याचा आग्रह झाला. त्यानुसार पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात मोठा आर्थिक आधार आणि उभारी मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

दरम्यान, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला जिल्ह्यातील ठरावधारक आणि दूध उत्पादकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करून निवडणुकीत समविचारी आघाडीला मोठे यश मिळेल, असा विश्वासही माजी आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान सरुड येथे मंगळवारी (ता.२९) सकाळी १० वाजता शाहुवाडी तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा आ. सतेज पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला आहे.

Satyajit Patil Sarudkar on Gokul Election
Gokul Election : ‘गोकुळ’साठी ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध?

शाहूवाडी-पन्हाळ्यातून कुटुंबात उमेदवारी नाही

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातून गोकुळसाठी सरूडकर कुटुंबातून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे सरूडकर गट नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात सरूडकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याना गोकुळच्या मैदानात उतरविले आहे.

आघाडीतील प्रमुख नेत्यांशी उमेदवारीबाबत चर्चा झाल्यानंतर आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार असल्याचेही सत्यजित पाटील यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी आ. बाबासाहेब पाटील-सरुडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील दूध संस्था आणि ठरावधारकांनी कसल्याही प्रलोभनाला बळी न पडता भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल या सर्व संस्थांचे त्यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news