Gokul Election : ‘गोकुळ’साठी ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध?

गुरुवारी प्रसिद्ध होणार अंतिम यादी
Gokul Election |
Gokul Election |
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ, ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्‍या उमेदवारी अर्जांच्‍या छाननी प्रक्रियेत ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. पोटनियमांची पूर्तता न केल्‍याने प्राथमिक टप्‍प्‍यात त्‍यांचे अर्ज बाद ठरविल्‍याचे समजते. मात्र, यापैकी काही उमेदवारांनी त्रुटी दूर करण्‍यासाठी वेळ मागितली आहे. त्‍यामुळे अवैध अर्जांची अधिकृत माहिती व पात्र उमेदवारांची यादी गुरुवारी (दि. २४) प्रसिद्ध केली जाणार आहे.

रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्‍ये ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्‍ये ३०१ उमेदवारांचे ४३६ अर्ज निवडणूक कार्यालयाकडे प्राप्‍त झाले होते. अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्‍ये सर्वसाधारण गटातून १८, इतर मागास, महिला राखीवमधून प्रत्‍येकी १५ आणि अनुसूचित जाती, भटके विमुक्‍त गटातून प्रत्‍येकी ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविल्‍याचे समजते. यासंदर्भातील अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news