Satej Patil Gokul Election : म्हशीची धार कधी काढायची, हेही आता मुंबईतून ठरणार का?

आ. सतेज पाटील यांचा खोचक सवाल; समविचारी आघाडीच्या पॅनेलची गुरुवारी घोषणा
Satej Patil
आमदार सतेज पाटील (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर प्रशासक आणण्यापासून अवसायनातील संस्थांचे अधिकार ठरविण्यापर्यंत सर्व निर्णय मुंबईतून होत असतील तर भविष्यात म्हशीची धार कधी काढायची, हेही मुंबईतूनच ठरणार का? असा खोचक सवाल आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला केला. कोल्हापुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आ. पाटील यांनी, समविचारी आघाडीची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून पॅनेलमधील उमेदवारांबाबत अंतिम निर्णय झाला आहे. गुरुवारी दुपारी चार वाजण्यापूर्वी समविचारी आघाडीचे संपूर्ण पॅनेल जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले.

Satej Patil
Gokul Election | गोकुळ निवडणूक : मंगळवारी केवळ ११ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे; अद्याप २०७ उमेदवार रिंगणात

ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत झालेल्या चुका आयोगाने मान्य केल्या आहेत. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार एकत्र आले असताना शांततेत सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत आहे. ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर संबंधित सचिवांची घाईघाईने बदली करण्यात आली. प्रकरणात तथ्य आढळल्यामुळेच ही बदली झाली असून संबंधित सचिवांनी राजीनामा द्यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे.

Satej Patil
Gokul Election| ‘गोकुळ’मध्ये आता होणार थेट लढत

विद्यार्थ्यांना मेगाभरतीचे गाजर

आ. पाटील म्हणाले, ७० हजार जागांच्या मेगाभरतीचे गाजर दाखवून सरकारने विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढवल्या; मात्र शासनाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता एवढी भरती करण्याची क्षमता आहे का, हा प्रश्न आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षा तरी सुरळीतपणे पार पाडाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राहुल गांधी यांनी पहिल्या दिवसापासून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला असून देशातील तरुणांचा आवाज बनल्यामुळेच भाजपला त्याचा त्रास होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news