Gokul Election | गोकुळ निवडणूक : मंगळवारी केवळ ११ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे; अद्याप २०७ उमेदवार रिंगणात

महायुतीच्या जागावाटपाचा गुंता मुंबईत सुटल्याची माहिती
Pudhari
GokulPudhari
Published on: 
Updated on: 

Gokul Election Nomination

आशिष ल. पाटील

गुडाळ : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीसाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना मंगळवारी केवळ ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे मंगळवारअखेर तब्बल २०७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाचा गुंता मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बुधवारी अर्ज माघारीची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मंगळवारी सर्वसाधारण गटातून चार उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये भोगावतीचे माजी ज्येष्ठ संचालक ए. डी. पाटील (गुडाळकर), अ‍ॅड. संजय सरदेसाई आणि गोकुळचे निवृत्त अधिकारी शामराव तिकोडे यांचा समावेश आहे. महिला राखीव गटातून दोन महिला उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Pudhari
Devendra Fadnavis on Gokul election: गोकुळमध्ये मुश्रीफांचेच नेतृत्व; निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

इतर मागासवर्गीय गटातून चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले आणि मोहन धुंदरे यांचा समावेश आहे. भटक्या-विमुक्त जाती गटातून माजी संचालक बयाजी शेळके यांचे सुपुत्र शरद शेळके यांनी एकमेव माघार घेतली. अनुसूचित जाती-जमाती गटातून मात्र मंगळवारीही एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.

मंगळवारअखेर सर्वसाधारण गटात १३०, इतर मागासवर्गीय गटात ३२, महिला गटात २६, विमुक्त-भटक्या जाती गटात १०, तर अनुसूचित जाती-जमाती गटात ९ उमेदवार रिंगणात आहेत. अशा प्रकारे एकूण २०७ उमेदवार अद्याप निवडणूक मैदानात आहेत.

Pudhari
Gokul Election | १९०० ठराव असूनही नऊ जागा; महायुतीत राष्‍ट्रवादी काँग्रेस नाराज

उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत गुरुवार, ८ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत इच्छुकांची मनधरणी करून त्यांना माघार घेण्यास राजी करण्यासाठी विविध राजकीय गटांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. विशेषतः महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी किती उमेदवार माघार घेतात, याकडे आता गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news