दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे जगताप, पाटील, पवार, ढमाळ, मोरे यांना पुरस्कार

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे जगताप, पाटील, पवार, ढमाळ, मोरे यांना पुरस्कार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२० मधील ग्रंथ पुरस्कारासाठी संतोष जगताप, डॉ.जगन्नाथ पाटील, डॉ.दीपक पवार, सुचिता घोरपडे, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली. दोन जानेवारी,२०२२ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

संतोष जगताप यांच्या 'विजेने चोरलेले दिवस' या कादंबरीस देवदत्त पाटील पुरस्कार, सुचिता घोरपडे यांच्या 'खुरपं' या कथासंग्राहास शंकर खंडू पाटील पुरस्कार, डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या 'चंबुखडी ड्रीम्स' आत्मचरित्रास अण्णा भाऊ साठे पुरस्कार, डॉ. दीपक पवार यांच्या 'महाराष्ट्र –कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' ( संकीर्ण) या पुस्तकास कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार अंजली ढमाळ यांच्या 'ज्याचा त्याचा चांदवा' या कवितासंग्रहास शैला सायनाकर पुरस्कार, संपत मोरे यांच्या 'मुलूखमाती' या व्यक्तीचित्रणास चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) पुरस्कार जाहीर झाला. तसेच महादेव बुरुटे यांच्या 'भुताचं झाड' या पुस्तकास बालवाड्मय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यंदा देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांमध्ये चंद्रकांत देशमुखे पुरस्कार माधुरी मरकड यांच्या 'रिंगण' , शाहीर कुंतीनाथ करके पुरस्कार प्रा. आनंद गिरी यांच्या 'भेदिक शाहिरी', बाळ बाबर पुरस्कार सुनील इनामदार यांच्या 'त्रिवेणी' या साहित्यकृतींना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विष्णू पावले यांच्या 'पधारो म्हारो देस' (प्रवासवर्णन), डॉ.कृष्णा भवारी यांच्या 'मातेरं', आप्पासाहेब रेपे यांच्या 'मजल दरमजल', ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'लॉकडाऊन' , योगिता राजकर यांच्या 'चैत्रचाहूल' , राजेंद्र पाटील यांच्या 'रंकाळा', मारुती कटकधोंड यांच्या 'डोहतळ', डॉ. शिवाजी शिंदे यांच्या 'कैवार', मधुकर फरांडे यांच्या 'कोंडी' या साहित्यकृतींनाही गौरविण्यात येणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा ,सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२० या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून विजय चोरमारे, कृष्णात खोत, डॉ. प्रमिला जरग, दि. बा. पाटील यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभ रविवारी दोन जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५. वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक,कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news