वर्ल्ड मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी रोहित हवालदारची निवड

वर्ल्ड मास्टर्स जलतरण स्पर्धेसाठी रोहित हवालदारची निवड
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जपान मधील फुकुओका येथे जागतिक जलतरण संघटने (फिना) तर्फे दि. ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड अॅक्वॅटिक मास्टर्स चॅम्पियनशिप (जलतरण) स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोल्हापूरच्या रोहित राजेंद्र हवालदार याची निवड झाली आहे. या स्पर्धेत रोहित १०० व २०० मीटर बॅक स्ट्रोक, २०० मीटर फ्री स्टाईल व रिले प्रकारात सहभागी होणार आहे.

रोहितने अजापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, साऊथ एशियन गेम्स आदी आंतरराष्ट्रीय तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व करून विविध पदकांसह विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने त्याचा गौरव करण्यात आला आहे.

-.हेही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news