Kolhapur Rain Update| कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा इशारा पातळीच्या दिशेने; ५६ बंधारे पाण्याखाली

Kolhapur Rain Update| जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain UpdateFile Photo
Published on
Updated on

Kolhapur Rain Update

कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदी आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, पंचगंगेची पाणी पातळी ३३.६ फुटांवर पोहोचली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Kolhapur Rain Update
Kolhapur : डेंग्यू डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती बेसमेंटमध्येच

जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक ग्रामीण भागांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच नदी इशारा पातळी गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Kolhapur Rain Update
Kolhapur Rain : शंभरावर गावांचा थेट संपर्क तुटला

पूर नियंत्रण कक्षाने पुढील यादी जाहिर केली असून, विविध नद्यांवरील बंधाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. एकूण १६ नद्यांवर एकूण ५६ बंधारे आहेत.

पंचगंगा नदीवरील बंधारे – शिंगणापूर, राजाराम, सुवे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
कुंभी नदीवरील बंधारे – सांगाशी, शेणवडे, कळे, मांडुकले
कासारी नदीवरील बंधारे – ठाणे आळवे, यवलुज, बा. भोगाव
भोगावती नदीवरील बंधारे – हळदी, राशिवडे, शिरगांव, सरकारी कोगे, तारळे
दूधगंगा नदीवरील बंधारे – दत्तवाड, सोळंकी, सुक्कटू, बाचणी
वारणा नदीवरील बंधारे – मांगले-सावर्डे, कडोली
हिरण्यकेशी नदीवरील बंधारे – साळगाव, ऐनापूर, निलजी, हाजगोळी, हरळी, भडगाव, झरळी
तुळशी नदीवरील बंधारे – बीड, आरे, बाचणी
घाटप्रभा नदीवरील बंधारे – कानडे सावर्डे, हिंडगाव, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, पेळणी, भिजुर्भोगोली
वेदगंगा नदीवरील बंधारे – म्हसवे, गारगोटी, करवडे, शेंणगाव
सर्फनाला नदीवरील बंधारा – दाभीळ
ताम्रपाणी नदीवरील बंधारे – कुरतणवाडी, कोकरे, चंदगड, हल्लारवाडी, माणगाव
वित्री नदीवरील बंधारा – करपेवाडी
धामणी नदीवरील बंधारे – सुळे, अंबर्डे

एकूण बंधारे – ५६

शाखाधिकारी, विभागीय पूर नियंत्रण कक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news