कोल्हापूर : मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेला नातेवाईकांना तरूणांकडून मारहाण

File Photo
File Photo

धामोड; पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथील कॉलेज जाताना एका तरूणीचा तरूणांनी विनयभंग करत लग्न करण्याची धमकी दिली. घडलेला हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या नातेवाईकांना तरूणांनी मारहाण केली. या प्रकरणी राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, धामोड येथील कॉलेज सुटल्यानंतर संबंधित मुलीला एका हॉटेलसमोर वैभव सावंत व दिपक सावंत यांनी मोटरसायकलवरून पाठलाग केला. पुढे तिला रस्त्यामध्ये अडवून लग्नाचा धमकी देत त्रास दिला.

याबबत संबंधित मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितला. याचा जाब मुलीच्या नातेवाईकांनी विचारला असता त्याला संशयित आरोपींनी कुऱ्हाडीने मारहाण केली. संबंधित मुलगी अल्पवयीन असुन याबबत मुलीच्या आईने राधानगरी पोलीसात तक्रार केली आहे . संबंधित आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. ईश्वर ओमासे करत आहेत.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news