कोल्हापूर : आदमापूर येथील बाळुमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांचे निधन

रामभाऊ मगदूम
रामभाऊ मगदूम
Published on
Updated on

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : नरतवडे ( ता. राधानगरी) येथील विविध संस्थांचे अध्यक्ष, साखर कामगार सभा कोल्हापूरचे अध्यक्ष, बिद्री साखर कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी व आदमापूर येथील संत बाळुमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ बापूसाहेब मगदूम (वय ८१) यांचे निधन झाले.

शालेय जीवनापासून ते समाजवादी चळवळीत कार्यरत होते. डाव्या विचारसरणीशी निगडीत राहिल्याने त्यांचा जनहिताच्या अनेक आंदोलनात सहभाग होता. साखर कामगार सभा अध्यक्ष व बिद्री साखर कारखान्याचे कामगार प्रतिनिधी या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. गावातील दत्त दूध संस्थेचे अध्यक्ष असताना आदर्शवत काम केले. कारखान्याच्या सेवा निवृतीनंतर त्यांनी आदमापूर बाळुमामा देवालय समितीच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा स्विकारली. २००२ पासून ते कार्याध्यक्ष होते. मंदिर व परिसर विकासाच्या अनेक योजना राबवून त्यांनी मंदिराची महती सर्वदूर पोहचविण्यातही त्यानी महत्वाचा वाटा उचलला. आदमापूर येथे भक्तांसाठी नविन हार्बर मंदिर, भक्तनिवास, हास्पिटल, दर्शन मंडप उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

अंत्ययात्रेत बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, रावसाहेब कोणकेरी, सर्व ट्रस्टी, कॉ. आनंदराव आबिटकर, राजेंद्र पाटील, दिनकरराव कांबळे, दत्तात्रय पाटील, नंदकुमार ढेंगे, यशवंत पाटील, शामराव मोरे, राजु मगदूम, राजाभाऊ माळी, डी. डी. चौगले, सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नरवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी ,सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी ( २२ फेब्रुवारी) करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news