Raju Shetti|3400 उचल आम्हाला मान्य नाही, ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर भूमिगत होऊन आंदोलन करा : राजू शेट्टी

कोल्हापूर येथे बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आदेश : ७ नोव्हेंबरला निगवे येथून आंदोलनाची दिशा ठरवणार
Raju Shetti
ऊसदरप्रश्नी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघनेचे नेते राजू शेट्टी Pudhari Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश देऊन ७ नोव्हेंबर रोजी निगवे (ता.करवीर) येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

Raju Shetti
Kolhapur News | जय शिवराय किसान संघटनेने वारणेची ऊस वाहतूक रोखली

कोल्हापूर येथे राजू शेट्टी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बैठक घेतले यावेळी ते बोलत होते. शक्ती पुढे म्हणाले, सांगली , कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व शेतकरी संघटना, कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे मागणी केली आहे.

Raju Shetti
Kolhapur News : ऊस दर आंदोलन पेटले

गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षी सुध्दा साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतक-यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस कारखानदार गुंडाकरवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतक-यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.

यावेळी राजेंद्र गड्ड्यानावर, अजित पोवार, सचिन शिंदे, तानाजी वठारे, धनाजी पाटील, जयकुमार कोले, बाजीराव पाटील, अजित पाटील, बाळासाहेब पाटील, प्रभू भोजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news