राधानगरी पोलीसांकडून हुल्लडबाज पर्यटकांवर धडक कारवाई; लाखोंचा दंड वसूल

राधानगरी पोलीस
राधानगरी पोलीस
Published on
Updated on

राशिवडे ; पुढारी वृतसेवा :  पर्यटनाच्या नावाखाली मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर राधानगरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मोटर व्हेइकल ॲक्टखाली ८३ जणांवर कारवाई करुन लाखोंचा दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्‍यान, सात जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे.

राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्यासह तालुक्यातील अन्य ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी येत असतात. परंतु मद्यपी आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धबधब्याजवळ जाऊन मद्य रिचवत जीवघेणे स्टंट करणे, तिब्बल सीट दुचाकी चालवणे, ओरडाओरडी करणे, दंगा करणे, कर्णकर्कश हाँर्न वाजविणे आदी त्रासदायक प्रकार काही हुल्लडबाज पर्यटकांकडून होत आहे.

धिंगाणा करणार्‍या पर्यटकांना  हात जोडून विनंती करणाऱ्या पोलिसांनाच मद्यपी पर्यटकांकडून शिवीगाळ होण्याचा प्रकार रविवारी घडला. त्यामुळे धबधब्याच्या कड्यावर जाऊन स्टंट करणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांनी खाक्‍या दाखवत चोप दिला होता. या कारवाईचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. राधानगरी पोलीसांकडून सुरु असणाऱ्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news