Radhanagari Panchayat Samiti | राधानगरी पंचायत समितीला मिळणार एकच स्वीकृत जागा! इच्छुकांच्या हालचाली गतीमान!

Radhanagari Panchayat Samiti Single Seat Aspirants - राधानगरी पंचायत समितीला मिळणार एकच स्वीकृत जागा! विरोधी गटाची नोंदणी नसल्याचा परिणाम! इच्छुकांच्या हालचाली गतीमान!
Radhanagari Panchayat Samiti
Radhanagari Panchayat Samiti
Published on: 
Updated on: 

गुडाळ : आशिष ल.पाटील

पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 4 डिसेंबर रोजी इच्छुकांचे अर्ज गटनेत्यांमार्फत मागविले आहेत. राधानगरी पंचायत समितीवर 10 निर्वाचित सदस्य असल्याने 2 स्वीकृतचा कोटा मंजूर आहे. तथापि, विरोधी आघाडीने गट नोंदणीच न केल्याने राधानगरी पंचायत समितीला सत्तारूढ आघाडी मार्फत एकच स्वीकृत सदस्य मिळणार आहे.

दरम्यान, पंचायत समितीवर राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता असली तरी काँग्रेसच्या 6 पैकी गटनेत्यासह 5 सदस्य ए वाय पाटील गटाचे असल्याने याच गटाच्या कार्यकर्त्याला स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने जिल्हा परिषदच्या 5 पैकी 3 तर पंचायत समितीच्या 10 पैकी 6 जागा जिंकून पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले.

पंचायत समितीच्या उर्वरित 4 पैकी 2 जागा शिवसेनेला तर 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. सभापती- उपसभापती निवडी वेळी परस्परविरोधी लढलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढविली. ए वाय यांचे बंधू राजेंद्र पाटील यांची सभापतीपदी तर अश्विनी चंद्रकांत पाटील यांची उपसभापती पदी बहुमताने निवड झाली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या सहा सदस्यांनी मोहन पाटील (पडळी) यांना गटनेते करून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गट नोंदणी केली. विरोधी आघाडी कडून एकत्र येऊन गटनोंदणी झालीच नाही. परिणामी स्वीकृतची एकच जागा मिळणार आहे.

Radhanagari Panchayat Samiti
Kolhapur Police | कोल्हापूर जिल्ह्यात ४ नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव

एका स्वीकृत जागेसाठी नामदेवराव मुसळे (सरवडे ), प्रकाश चरापले (कौलव), प्रकाश मोहिते (गुडाळवाडी), धनाजी पाटील (कोदवडे), संग्राम कदम (नरतवडे) हे ए. वाय. समर्थक इच्छुक आहेत. मुळ काँग्रेस गटातून ही अनेक जण इच्छुक आहेत. गटनेते यापैकी कोणाची शिफारस करणार? कालावधी कमी करून किती इच्छुकांना संधी मिळणार? याकडे इच्छुकांचे लक्ष आहे.

Radhanagari Panchayat Samiti
Uday Samant | कोल्हापूर, सांगली, सातारा भागाचा इकॉनॉमिक झोन म्हणून विकास : उद्योग मंत्री सामंत 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.