Kolhapur House Fire: शाहूवाडीतील पेढेवाडीत पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; प्रापंचिक आणि शेतीचे साहित्य जळून खाक

शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे पैकी पेढेवाडी येथे राहत्या पाच घरांना अचानक लागलेल्या भीषण आगीत प्रापंचिक आणि आर्थिक मोठे नुकसान झाले आहे.
Pedewadi House Fire
Pedewadi House FireFile Photo
Published on: 
Updated on: 

Kolhapur House Fire

बांबवडे/सरूड : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे पैकी पेढेवाडी  येथे राहत्या पाच घरांना अचानक लागलेल्या भीषण आगीत प्रापंचिक आणि आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी स्थानिकांनी वर्तविला आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जळीतग्रस्त घरातील रहिवासी लोकं डोंगरात गवत कापण्यासाठी गेले होते. सुदैवाने जीवितहानी टळली. महसूल विभागात या जळीत घटनेची नोंद झाली आहे.

घटनास्थळी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांबवडे बाजारपेठेपासून दक्षिणेकडे साधारण १४ किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत परखंदळे पैकी पेढेवाडी वस्ती आहे. येथील अर्जुन गोडसे हे कुटुंबियांसह बुधवारी सकाळी लवकर डोंगर शेतातील गवत कापण्यासाठी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या कौलारु छाप्परातून सकाळी साडेदहाच्या सुमारास धुराचा लोट निघताना काही ग्रामस्थांनी पाहिले. आरडावोरड झाल्यामुळे घटनास्थळी जमलेल्या गावकऱ्यांनी साठवण केलेल्या पाण्याच्या माध्यमातून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र लाकूडफाट्याच्या छप्परामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे नागरिकांच्या प्रयत्नांना मर्यादा येत होत्या. यामुळे शेजारी लगतच्या हिंदुराव लवटे, आनंद लवटे,  सुरेश लवटे, मारुती लवटे, गुंगा यादव यांच्या घरांना आगीने वेढले.

Pedewadi House Fire
Kolhapur Boundary Extension | कोल्हापूरची हद्दवाढ करा; प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावा

दरम्यान, पंचक्रोशीतील जमा झालेल्या गावकऱ्यांनी पाचारण केलेली अग्निशामन दलाची गाडी पेढेवाडीचा रस्ता चुकून उलट दिशेला पिशवी पैकी खोतवाडी गावाकडे गेल्यामुळे मूळ घटनास्थळी पोहचायला अधिक वेळ लागला. तोपर्यंत अर्जुन गोडसे यांचे घर जळून पूर्णपणे बेचिराख झाले. तर आगीने वेढलेल्या उर्वरित घरांना देखील नुकसानीचा मोठा फटका बसला. अर्जुन गोडसे यांच्या जळालेल्या घरात घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी केलेल्या पाहणीत भांडी, पत्र्याची पेटी, कपडे, काही कागदपत्रे शिवाय छोट्याशा डब्यात घरखर्चासाठी ठेवलेली रोकड आदी सर्व साहित्य बेचिराख होऊन सारा संसार उघड्यावर आल्याचे भीषण चित्र नजरेस पडले.

यावेळी स्थानिक सरपंच सिताराम पाटील, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न करून आज विझवण्याचा प्रयत्न केला. तलाठी पल्लवी पाटील, ग्रामसेवक राणी मुंडे यांच्यासह साक्षीदारांच्या समक्ष जळीत नुकसानग्रस्त घटनेचा पंचनामा करण्यात आला. जळीत नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय सानुग्रह मदत देऊन दिलासा देण्याची आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महसूल यंत्रनेकडे केली.

Pedewadi House Fire
Kolhapur News : शिरोलीत पोल्ट्री शेडला भीषण आग; दहा लाखांचे नुकसान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.