त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी हजारो दिव्यांनी उजळले

नृसिंहवाडी
नृसिंहवाडी
Published on
Updated on

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी शेकडो दीप प्रज्वलित करून मंदिराचा घाट उजळून टाकण्यात आला. दोन दिवस पौर्णिमा तसेच मंगळवारीच्या चंद्रग्रहणाच्या निमित्त असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने दत्त दर्शनासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी चंद्रग्रहण सुटल्यानंतर भाविकांनी कृष्णा नदीत स्नानासाठी तसेच दर्शनासाठी गर्दी केली होती. कृष्णा पंचगंगा नदीत दीप प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. या निमित्त अनेक भाविकांनी मंदिराच्या समोरील घाट उजळण्यासाठी दिव्या बरोबर मेणबत्तीचा वापर केला.

त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मंदिराच्या दगडी कमानी बाहेर मेणबत्त्या पणत्या विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले होते. सायंकाळी दत्त दर्शनासाठी येणारे भाविक याच मेणबत्त्या पणत्या घेऊन कृष्णा पंचगंगा घाट प्रज्वलित करताना दिसून येत होते. पौर्णिमेनिमित्त पहाटे काकड आरती दुपारी महापूजा सायंकाळी उशिरा धूपदीप आरती पालखी सोहळा असे कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले. संस्थानने वेगवेगळ्या दर्शन रांगांची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर दत्त देवस्थान मार्फत मोफत सुरू असलेल्या अन्नछत्राचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. मंगळवारी चंद्रग्रहण असल्यामुळे उशिरापर्यंत स्नान तसेच दत्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news