Nrusinghwadi Datta Mandir : ऐन नवरात्रोत्सवात नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पुराचे पाणी

२४ तासांत पाणीपातळीत १५ फुटांहून अधिक वाढ
Nrusinghwadi Datta Mandir
ऐन नवरात्रोत्सवात नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी
Published on
Updated on

नृसिंहवाडी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन नवरात्रोत्सवात नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात कृष्णा पंचगंगा नद्यांचे पाणी आले आहे. मागील २४ तासांत पाणीपातळीत तब्बल १५ फुटांहून अधिक वाढ झाल्याने मंदिर परिसराला पुराचा वेढा पडला आहे.

Nrusinghwadi Datta Mandir
Narsobawadi Temple : पाण्यातूनच पालखी सोहळा : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरातील अनोखा भक्तिमय अनुभव

मुसळधार पाऊस कोसळल्याने नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. रविवारी (दि.२८) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते. येथे नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात शक्यतो पूरस्थिती निर्माण होत नाही. मात्र, सध्या पुराच्या पाण्यातूनच भाविक दत्त दर्शन घेत आहेत. श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून सर्व साहित्य सुरक्षित हलविण्यात येत आहे.

दुर्मिळ योग

गणेशत्सवानंतर नदीचे पाणी पात्रात गेले की पुन्हा पूरस्थिती उद्भवत नाही. त्यामुळे परंपरेनुसार विजयादशमी पासून पालखी सोहळा सुरू होतो. मात्र, धुवाधार अवकाळी पावसामुळे मंदिरात पाणी आले आहे. आणखी तीन ते चार फूट पाणी वाढल्यास रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षातील असा प्रथमच दुर्मिळ योग अनुभवण्यास मिळणार आहे.

Nrusinghwadi Datta Mandir
Mahalakshmi Temple Dawdi: दावडीतील महालक्ष्मी मंदिराला 350 वर्षांचा इतिहास, नवरात्रात हजारो भाविकांची गर्दी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news