Mahalakshmi Temple Dawdi: दावडीतील महालक्ष्मी मंदिराला 350 वर्षांचा इतिहास, नवरात्रात हजारो भाविकांची गर्दी

गायकवाड घराण्याचा वारसा असलेले मंदिर ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुन्हा भव्य स्वरूपात उभे
Mahalakshmi Temple Dawdi
दावडीतील महालक्ष्मी मंदिराला 350 वर्षांचा इतिहास, नवरात्रात हजारो भाविकांची गर्दीPudhari
Published on
Updated on

वाफगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी गावात सुमारे 350 वर्षांचा इतिहास लाभलेले प्राचीन महालक्ष्मी मंदिर आहे. ही महालक्ष्मी माता परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिराला दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त हजारो भाविक भेट देतात. (Latest Pune News)

सन 1729 ते 1739 दरम्यान सयाजी गायकवाड महाराज यांच्या पूर्वजांनी या परिसरात भव्य राजवाडा उभारला. वाड्यासभोवती तटबंदी, पाणीपुरवठ्यासाठी दगडी विहिरी अशा सोयी करण्यात आल्या. याच ठिकाणी गायकवाड घराण्याला महालक्ष्मी मातेसंबंधी दृष्टान्त झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दगडी चिरेबंदी महालक्ष्मीचे मंदिर उभारण्यात आले. असा हा मंदिराप्रती गायकवाड घराण्याचा वारसा आहे.

Mahalakshmi Temple Dawdi
Manchar News: भीमाशंकर परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लावा; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची सूचना

त्या काळात भक्तांना देवीसाठी उभारलेल्या तळघरातूनच दर्शन घ्यावे लागते, अशी वैशिष्ट्‌‍यपूर्ण परंपरा आजही जुन्या पिढ्यांकडून सांगितली जाते. दरम्यान, काळाच्या ओघात गायकवाड घराण्याने सत्तेत झालेल्या बदलामुळे आपला मुक्काम बडोद्याला हलविला. सुमारे अर्धशतकानंतर मंदिर आणि वाड्याची सूत्रे सरदार कृष्णराव शितोळे यांच्या हाती देण्यात आली.

Mahalakshmi Temple Dawdi
Yogesh Tilekar CM Relief Fund: बळीराजाच्या मदतीला आ. योगेश टिळेकर धावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत

गेल्या 20 ते 22 वर्षांत दावडी ग्रामस्थांनी नी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेऊन मोठी जबाबदारी हाती घेतली. पूर्वीचे जीर्ण झालेले दगडी मंदिर पाडून त्याच दगडांचा वापर करून नव्याने नवे मंदिर उभारले. ग्रामस्थांच्या श्रमदानासह तसेच आर्थिक योगदानामुळे आज मंदिराची वास्तू अधिक आकर्षक व मजबूत बनली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिकांबरोबरच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर अशा ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.

Mahalakshmi Temple Dawdi
Shivane cleanliness drive: स्वच्छता अभियानाद्वारे शिवणे- उत्तमनगरमध्ये सफाई

हे मंदिर स्थानिकांच्या एकतेचे प्रतीक आहे. हे मंदिर एकप्रकारे सांस्कृतिक वारसाच असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गायकवाडांच्या काळापासून सुरू झालेला हा वारसा पिढ्यान्‌‍ पिढ्या ग्रामस्थांनी जपला आहे.

दावडी येथील तळ्याजवळ वसलेले महालक्ष्मी मातेचे मंदिर. दुसऱ्या छायाचित्रात महालक्ष्मी मातेची रेखीव मूर्ती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news