नितीन भोसलेचा खून नाही तर वीज पडून मृत्यू

शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट
Kolhapur News
नितीन भोसलेचा खून नाही तर वीज पडून मृत्यू Pudhari Photo
Published on
Updated on

किणी : अमृतनागर -पारगाव रस्त्यावर निर्जन ठिकाणी नितीन मानसिंग भोसले (वय ३० रा. मोहरे, सध्या रा.वारणानगर) याचा मृतदेह आढळला होता. प्रथमदर्शनी हा खून झाल्याचे वाटत होते. मात्र, शवविच्छेदन केल्यानंतर नितीनचा मृत्यू हा त्याच्या अंगावर वीज कोसळून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खुन झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Kolhapur News
बीड : वीज दुरुस्तीचे काम करताना विद्युत खांबावरून पडून तरूणाचा मृत्यू

मोहरे येथील मानसिंग भोसले हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. मानसिंग भोसले शाहूवाडी तहसीलदार कार्यलयात नोकरीत आहेत. तर त्यांचा मुलगा नितीन अभियंता होता. मागील दहा ते बारा वर्षे हे सर्व कुटुंबीय कामानिमित्त वारणानगर येथे राहत आहेत. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास नितीन हा जेवायला जातो असे सांगून घरातून मोटरसायकल घेऊन बाहेर पडला होता. रात्री साडेदहा पर्यंत त्याचा मोबाईल चालू होता. पण त्यानंतर मोबाईल बंद लागत असल्याने शोधाशोध सूरु होती.

Kolhapur News
वीज पडून एका महिलेचा मृत्यू; दुसरी गंभीर जखमी

सकाळी साडेनऊच्या सुमारास पारगावच्या पोलीस पाटील यांना अज्ञात तरुण मोटारसायकलसह अमृतनगर पारगाव रस्त्यावर मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली. ही घटना वडगाव पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथम दर्शनी त्याचा खून केला असावा, अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास करणेस सुरुवात केली. तपासादरम्यान काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आले. दरम्यान मयत नितीन भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. डॉ.अश्वथी गावडे यांनी शवविच्छेदन केले असता मयत नितीन भोसले यांच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच मयत नितीन भोसले याचे अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुस देखील जळाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news