वीज पडून एका महिलेचा मृत्यू; दुसरी गंभीर जखमी

सावली तालुक्यातील केरोडा शेतशिवारातील घटना
A woman died due to lightning; Another woman seriously injured
वीज पडून एका महिलेचा मृत्यू; दुसरी गंभीर जखमीFile Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

सावली तालुक्यातील केरोडा येथे शेतात काम करीत असताना वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आज (बुधवार) दुपारी घडली. चित्रकला सुधाकर भुरसे असे मृत महिलेचे नाव आहे. शालू भास्कर भुरसे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, सावली तालुक्यातील केरोडा येथील राहूल भंडारे यांच्या शेतशिवारात आज चार महिला काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. काम सूरू असताना दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी दोन महिला झोपडीत गेल्या तर दोन महिला ह्या शेतात थांबल्या होत्या. त्याचवेळी वीज पडल्याने चित्रकला सुधाकर भुरसे ह्या महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी शालू भास्कर भुरसे ही महिला गंभीर जखमी झाली.

सदर घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच जखमी महिलेला सावली येथील उप जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news