बीड : वीज दुरुस्तीचे काम करताना विद्युत खांबावरून पडून तरूणाचा मृत्यू

केजमधील घटना
Beed electric pole accident
विद्युत खांबावरून पडून तरूणाचा मृत्यू
Published on
Updated on

केज : विद्युत खांबावरील वीज दुरुस्तीचे काम करताना एका खाजगी कामगाराला विद्युतवाहिनीचा जोराचा धक्का लागला. त्यामुळे खांबावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. समीर शेख चाॅंद तांबोळी वय३५, रा. साळेगाव ता. केज ) असे या खाजगी कामगाराचे नाव आहे.

Beed electric pole accident
छ. संभाजीनगर : विद्युत तारेच्या धक्क्याने रुईखेडा येथील महिलेचा मृत्यू 

या बाबतची माहिती अशी की, समीर तांबोळी हा खाजगी कामगार म्हणून वीज दुरस्तीची कामे करीत असतो. दरम्यान शुक्रवारी (दि.२७) तो रोजा मोहल्ल्यातील स्टेट बॅक ऑफ इंडियाजवळ असलेल्या एका विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना त्याला विजेचा शॉक लागल्याने तो खांबावरून सिमेंट रस्त्यावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्याच्या डोक्याला, मणक्याला मार लागला होता. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. समीर तांबोळी यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. परंतु त्यानंतर त्यांना सोलापूर येथील सरकारी दवाखान्यात हलविले. सोलापूर येथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथे रुग्णवहिकेतून नेत असताना त्याचा इंद्रापूरजवळ रस्त्यात मृत्यू झाला.

Beed electric pole accident
'एनएनटीआर'च्या जंगलात जखमी वाघाची डरकाळी; वाघासह छाव्याचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news