

कागल; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कागल येथील मतदान केंद्रावर चुरशीने मतदान झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक हे मतदान सुरू झाल्यापासून दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर तळ ठोकून होते.
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची ते स्वागत करीत होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांना भेटण्यासाठी खासदार मंडलिक त्यांच्या बुथमध्ये गेले. या दोन्ही नेत्यांनी काही क्षण एकमेकांची विचारपूस केली. यावेळी दोन्ही गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदानासाठी मुश्रीफ गटाच्या मतदारांनी पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या. तर मंडलिक गटाच्या मतदारांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. अपक्ष उमेदवार अनिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पिवळ्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर मुश्रीफ गटाच्या 50 ते 60 मतदारांनी एकत्र येऊन मतदानाचा हक्क बजावला. मंडलिक गटाच्या 30 ते 40 मतदारांनी एकत्र येऊन मतदान केले. मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचलंत का?