सांगली : आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावावर अ‍ॅट्रासिटी, फसवणुकीचा गुन्हा दाखल

सांगली : आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या भावावर अ‍ॅट्रासिटी, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

आमदार गोपीचंद कुंडलिक पडळकर आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी ब्रम्हदेव पडळकर (रा. दोघेही पडळकरवाडी, ता. आटपाडी) यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महादेव अण्णा वाघमारे ( रा. झरे ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी वाघमारे, त्यांचा भाऊ विश्वास, बहीण शांताबाई कदम, मयत बहीण विनंता खरात हिची मुलगी मंजुश्री खरात, सौ मनिषा सोनावणे, मुलगा धनंजय खरात यांच्या मालकीची झरे हद्दीतील गट नं 624 मधील 12 एकर आणि गट नं 556 मधील 26 गुंठे जमिन कुलमुखत्यार पत्राच्या आधारे दि. 21 मार्च 2011 रोजी पडळकर यांनी घेतली.

त्याआधी सन 2008 मध्ये झालेल्या चर्चेत 10 लाख 50 हजार रुपयांना खरेदी घेण्याचे तोंडी ठरले. त्यापैकी 1 लाख हे दि. 11 ऑगस्ट 2008 पूर्वी दिले होते. त्यानंतर खरेदी दस्त करताना शासकीय स्टँप फीच्या पार्श्वभूमीवर येणारा खर्च कमी करुन कमी किंमतीत जमीन घेतल्याचे दाखवले. प्रत्यक्षात वेळोवेळी 4 लाख व खरेदी दस्तावेळी 75 हजार असे एकूण 5 लाख 75 हजार रुपये दिले. मात्र 4 लाख 75 हजार अद्यापही न देता फसवणूक केली आहे.

त्याशिवाय झरे येथील गट क्रमांक 624 या 12 एकर क्षेत्रात वाघमारे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 557/1 मधील जवाहर योजनेच्या विहीरीतील पाण्यावर व विहीरीच्या वीज कनेक्शनवर अतिक्रमण केले आहे. मार्च 2011 पासून आजपर्यत पाणी पुरवठा पाईपचा बेकायदेशीर, विनामोबदला वापर केला, अशा पद्धतीने तक्रार दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दोघांवर अ‍ॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल

पोलिसांनी आमदार पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल आहे. त्याबरोबरच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या (अ‍ॅट्रासिटी) नुसारही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news