Mother also dies due to shock of death of children at Koparde in Kolhapur
कोल्‍हापूर : मुलांचा दुर्देवी मृत्‍यू, विरह सहन न झाल्‍याने मातेनेही सोडले प्राण Pudhari Photo

कोल्‍हापूर : पोटच्या २ मुलांचा एकाचवेळी दुर्देवी मृत्‍यू, विरह सहन न झाल्‍याने मातेनेही सोडले प्राण

कोल्‍हापूर : मुलांचा दुर्देवी मृत्‍यू, विरह सहन न झाल्‍याने मातेनेही सोडले प्राण

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा

पोटच्या मुलांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने विरह सहन न झाल्याने आईला जबर धक्का बसला. या विरहाने व्याकुळ आईनेही प्राण सोडला. ही दुदैवी घटना कोपार्डे ता. शाहूवाडी येथे घडली. सौ नंदाताई कृष्णा पाटील (रा कोपार्डे, वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे अतीउच्च वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन सुहास कृष्णा पाटील व स्वप्नील कृष्णा पाटील या सख्ख्या भावांचा बुधवार (दि ३) रोजी दुर्देवी मृत्‍यू झाला होता. आज रविवारी दि ७ रोजी सुहास आणि स्वप्नील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. तत्पूर्वी त्यांचा शनिवारी (दि ६) रोजी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mother also dies due to shock of death of children at Koparde in Kolhapur
आषाढी वारीसाठी मिरजेतून सांगोला मार्गे पंढरीसाठी ४ विशेष रेल्वेंचे नियोजन

याबाबत अधिक माहिती अशी, कोपार्डे ता.शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ असणा-या शेतात सुहास कृष्णा पाटील (वय ३६) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय ३१) हे दोघे भाऊ भात रोप लावण आटोपून बुधवारी दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता, दादा काय झाल असे म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपली दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडिल कृष्णा पाटील तेथे गेले होते तेही यातून बचावल्याची चर्चा आहे. दोन्ही मुले गतप्राण झाल्याने ते भांबवून गेले. त्यांनी आरडा ओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने आई-वडिल, सुहासची पत्नी हताश झाली होती.

Mother also dies due to shock of death of children at Koparde in Kolhapur
मी त्याच्यासाठी सेहरा बनवत होते, तो 'तिरंगा' पांघरून घरी आला

आपल्या दोन्ही मुलांचा आकस्मित मृत्यू मृत नंदा पाटील यांना सहन झाला नाही. आज रविवार (दि ६) रोजी दोन्ही मुलांचे रक्षाविसर्जन होते. तत्पूर्वी शनिवारी रात्री अकरा वाजता आई नंदा यांना तीव्र ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले, मात्र त्यातच त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मावळली. दोन मुले, पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबिय उद्वस्त झाले आहे. जिवंतपणी मुलांना व पत्नीला अग्नी देण्याची वेळ कृष्णा पाटील यांच्यावर आली. त्यांच्या पश्चात पती कृष्णा पाटील, सून व एक वर्षाची नात असा परीवार आहे.

Mother also dies due to shock of death of children at Koparde in Kolhapur
उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक वारीत सहभागी

अश्रू आटलेल्या डोळ्यांमध्ये भयावह भवितव्याची चिंता !

'सुहास आणि स्वप्निल' या तरुण मुलांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील (वय ५६) यांचा शनिवार, दि.०६ जुलै २०२४ रोजी, मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पाटील कुटुंब संसाराचा रहाटगाडा गुण्यागोविंदाने हाकत होते. मात्र नियतीने वेगळा डाव साधून 'सुहास-स्वप्निल' यांच्या निधनानंतर आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्यावर काळाचा घाला घातला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर आज रविवारी (दि ७) रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काळीज पिळवटून काढणारा आक्रोश हा उपस्थितांना हेलावून गेला. तास-न-तास रडून यातील अनेकांच्या डोळ्यांमधील जणू काही अश्रू देखील आटले. मात्र पाटील कुटुंबियांच्या डोळ्यांमधील भयावह चिंता ही स्पष्टपणे दिसून येत होती.

logo
Pudhari News
pudhari.news