आषाढी वारीसाठी मिरजेतून सांगोला मार्गे पंढरीसाठी ४ विशेष रेल्वेंचे नियोजन

आषाढी वारीसाठी मिरजेतून सांगोला मार्गे पंढरपूरसाठी विशेष रेल्‍वेंचे नियोजन
Planning of special trains for Pandharpur via Sangola from Miraj for Ashadhi Wari
आषाढी वारीसाठी मिरजेतून सांगोला मार्गे पंढरपूरसाठी विशेष रेल्‍वेंचे नियोजन File Photo

जुनोनी : पुढारी वृत्‍तसेवा

पंढरपूरला आषाढी वारी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी सोलापूर विभागाकडून नागपूर मिरज, मिरज - नागपूर, मिरज पंढरपूर - मिरज, मिरज-कुर्डुवाडी या चार विशेष गाड्या धावणार आहेत.

यामध्ये नागपूर मिरज (०१२०५) ही रेल्वे नागपूर येथून दि. १४ रोजी सकाळी ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दि. १५ रोजी ११.५५ ला पोहोचेल. रेल्वे क्रमांक (१२०६) मिरज नागपूर ही गाडी दि. १८ रोजी मिरज इथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ ला पोहोचेल. रेल्वे क्रमांक (०१२०७) नागपूर मिरज ही गाडी नागपूर इथून दि. १५ रोजी सकाळी ८. ५० मिनिटांनी सुटेल आणि मिरज स्थानकावर दि. १६ रोजी सकाळी ११.५५ मिनिटांनी पोहोचेल.गाडी क्रमांक (०१२०८) मिरज नागपूर ही गाडी मिरज इथून दिनांक १९ रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि नागपूर स्थानकावर दुसऱ्यादिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. या गाड्या अंजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, आरग आणि मिरज या स्थानकावर थांबतील.

गाडी क्रमांक (०११०७/०११०८) मिरज-पंढरपूर-मिरज ही गाडी दिनांक १२ ते २१ जुलै रोजी पर्यंत मिरज पंढरपूर-मिरज या मार्गावर धावेल. मिरज इथून पहाटे ५ वाजता सुटेल तर पंढरपूरला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल तर, पंढरपूर इथून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल व मिरजेला दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच मिरज-कुडूवाडी-मिरज ही गाडी क्रमांक (०१२०९/०१२१०) ही गाडी दिनांक १२ जुलै ते २१ जुलै पर्यंत धावेल. ही गाडी मिरज इथून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटेल तर कुडूवाडी येथे सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. तर कुर्दुवाडी येथून रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि मध्यरात्री १ वाजता मिरज येथे पोहोचेल. या गाडीस आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासुद, सांगोला हे थांबे देण्यात आले आहेत. अशी रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळाली असल्याचे समजले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news