उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक वारीत Pudhari Photo
बारामती : पुढारी वृत्तसेवा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज (रविवार) दि. ७ रोजी सपत्नीक सहभागी झाले. शहरातील मोतीबाबागेपासुन ते काटेवाडीकडे पायी चालत ते वारीत सहभागी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सकाळी विमानाने मुंबईहुन बारामतीत दाखल झाले. तेथून मोटारीने जात ते मोतीबाग येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी सहभागी झाले. त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार या ही पायी चालत आहेत.
दरम्यान यंदा वारीत संपूर्ण पवार कुटुंबीय सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री यांच्या काटेवाडी येथील पवार फार्मवर दुपारी दिंडी प्रमुखांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे. शरद पवार हे देखील वारीत सहभागी होत आहेत.

