Maratha Reservation Protest : कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी, कडकडीत बंद

Maratha Reservation Protest : कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी, कडकडीत बंद
Published on
Updated on

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण देण्यासाठी शासन दिरंगाई करीत आहे. शासनाने त्वरीत मराठा आरक्षण द्यावे. तसेच उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बाचणी (ता. कागल) येथे मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. (Maratha Reservation Protest)

बाचणी येथील सकल मराठा समाज व व्यापारी वर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास सकाळी एकत्र जमले. अत्यावश्यक सेवा वगळता उत्स्फुर्त बंद पाळत सर्व व्यवहार बंद ठेवले. शासनाने त्वरीत मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे उपोषण करीत आहेत. त्यांना पाठींबा जाहीर करण्यात आला. शासनाने त्यांचा आणखी अंत न पाहता आरक्षणाबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कासारपुतळेत राजकीय नेत्यांना गावबंदी

सरवडे; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कासारपुतळे (ता.राधानगरी) येथे आयोजित केलेल्या बैठकीत गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा नाही, याबाबत एकमत घेण्यात आले. गावातून जनजागृती करत कँडल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी झालेल्या बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा, ४५ मराठी बांधवांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी देऊन आर्थिक मदत करावी, दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करावा व प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा, सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. मराठा आरक्षण देता येत नसेल तर लोकप्रतिनिधींना गावात बंदी असेल. येणाऱ्या सर्व निवडणूक मतदानावर मराठा समाजाचा बहिष्कार असेल, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news