पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाचे लोण राज्यभर पसरले असतांना त्याची धग आता पुण्यालाही लागल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर गाड्या अडवून, टायर जाळून रास्तारोको करण्यात आला आहे. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करून रस्ता बंद केला आहे. मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक अडवल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची झोप उडवली आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवत रास्ता रोको, जाळपोळ करीत आहे. अशा प्रकारे मराठा आंदोलक आता पूर्ण राज्यभर आक्रमक झालेले दिसून येत आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेचे आवाहन केलेले आहे, तरी राज्यभर मराठा आंदोलक हे आक्रमकपणे आंदोलन करताना दिसून येत आहे.
मराठा आंदोलकांचा हा आक्रमकपणा नवले ब्रिजवर सुद्धा पाहायला मिळाला. रास्ता रोको करून, टायर्स जाळून रस्ता अडवून धरलेला आहे. त्यामुळे नवले ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून मराठा समाजाचा आक्रोश दिसून येत असून लवकरात लवकर आरक्षण मिळाव यासाठी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा